Sunita Williams News: अवकाशातील मोहिमेनंतर पृथ्वीवर परतत असताना अवकाशयानात निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचा परतीचा प्रवास लांबला. काही दिवसांसाठीची ही मोहिम आता कैक महिने उलटले तरीही अद्याप सुरुच असून, नासासह एलॉन मस्कच्या स्पेस एक्सच्या वतीनंही त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपलब्ध माहितीनुसार या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी एक स्पेसक्राफ्ट अवकाशात पोहोचलं असून SpaceX च्या Crew Dragon कॅप्सुलला Freedom असं नाव देण्यात आलं आहे. शुक्रवारी हे स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनशी जोडलं गेलं. प्राथमिक माहितीनुसार हे स्पेसक्राफ्ट ISS च्या हार्मनी मॉड्युलवर आधारित असून. या Crew-9 मोहिमेसाठी अवकाशात पोहोचलेल्या नासाच्या निक हेग आणि Roscosmos च्या कॉस्मोनॉट अलेक्सांद्र गोरबुनोव यांचं आयएसएसवर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 


ISS चं नेतृत्त्वं सध्या सुनीता विलियम्स यांच्या हाती असून, त्यांची ही मोहीम पूर्ण होताच त्या आणि विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. शनिवारी क्रू 9 ही मोहिम लाँच करण्यात आली. सहसा या कॅप्सूलमधून 4 जणांना आयएसएसपर्यंत नेलं जातं. पण, या अवकाशयानातून मात्र दोनच अवकाशयात्री पाठवण्यात आले असून, ते परतताना सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणार आहेत. 



परतीच्या प्रवासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा जेव्हा पार पडला तेव्हा या कॅप्सूलमधून गेलेल्या अंतराळवीरांचं स्पेस स्टेशनवर मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलं. नासाच्या वतीनं यासंबंधीचा एक व्हिडीओही शेअर केला आहे, जिथं अंतराळवीरांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : उत्खननात सापडली 200 वर्षे जुनी रहस्यमयी चिठ्ठी; उघडताच समोर आलं एक नाव... कोण आहे ती व्यक्ती?


 


दरम्यान, क्रू-9 अवकाशात पोहोचण्यापूर्वीपासून विलियम्स आणि विल्मोर यांच्यासह एकूण 9 अंतराळवीर ISS वर हजर आहेत. उर्वरित 7 मंडळींमध्ये  माइकल बॅरेट, मॅथ्यू डोमिनिक, जीनेट एप्स आणि डोनाल्ड पेटिट यांच्यासह अलेक्जेंडर ग्रेबेनकिन, एलेक्सी ओविचिनिन आणि इवान वॅगनर यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हा आता टप्प्याटप्प्यानं आपआपल्या मोहिमा संपवून ही मंडळी आणि प्रामुख्यानं सुनीला विलियम्स, बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परतणार याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे.