सुनीता विलियम्स पृथ्वीवर परतण्यासाठी उजाडणार 2025; NASA नं घेतली मस्कची मदत
Nasa Sunita Williams News: सुनीता विल्यम्स या गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. आता त्यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. नासाने एक नवीन प्लान आखला आहे.
Nasa Sunita Williams News: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीला विल्यम्स यांनी दुसऱ्यांदा अंतराळात भरारी घेतली आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अंतराळात अकडले आहेत. नासाकडून त्यांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात फसलेल्या दोघांना अंतराळवीरांना घरवापसीसाठी सर्व पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. यातील एका पर्यायाचा विचार केल्यास दोघा अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी 2025पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यात स्पेसएक्सदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासाचा मुख्य पर्याय हा बुच आणि सुनीता यांना स्टारलायनर यानातून पृथ्वीवर परत आणण्याचा आहे. तसंच, त्याचबरोबर अन्य काही पर्याय आहेत का याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.
स्टिच यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासा एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीसोबत काम करत आहेत. आम्ही स्पेसएक्ससोबत मिळून हे निश्चित करत आहोत की क्रू 9 व्यवस्थितरित्या काम करत आहे का? कारण आम्हाला गरज पडल्यास बुच आणि सुनीता विलियम्स यांना क्रु 9तून पुन्हा पृथ्वीवर आणण्यात येईल, असं स्टिच यांनी म्हटलं आहे. यापूर्वी मंगळवारी नासाने म्हटलं होतं की, स्पेसएक्स क्रू 9 मिशन पुन्हा लांबण्याची घोषणा केली होती. 25 सप्टेंबरनंतर याचे प्रक्षेपण टाळण्यात येणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रक्षेपण होणार होते. हे यान चार क्रु मेंबरना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन (ISS)पर्यंत जाणार होतं.
क्रु 9च्या लाँचिगबद्दल बोलतानाच अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी स्टारलाइनरमध्ये फसलेल्या दोन आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येण्याची योजना बनवली आहे. 2025पर्यंत सुनिता आणि विल्यम यांना पृथ्वीवर परत घेऊन येणे हे आमचं उद्दिष्ट आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, आम्ही क्रू 9साठी ड्रॅगनची स्थापना केली आहे. जेणेकरुन त्यात लवचिकता असेल. यावेळी फक्त दोन आंतराळवीरच अंतराळात भरारी घेतील. जेणेकरुन फेब्रुवारी 2025मध्ये चार क्रू सदस्यांना पृथ्वीवर परत आणता येईल. हे दोन आंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स असतील.
जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत सुनिता विल्यम्स
अद्याप या योजनेला मजुंरी मिळालेली नाहीये. बोइंगचे स्टारलाइयनर यान 5 जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना घेऊन अंतराळात गेले होते. त्यानंतर एक आठवडा तिथे थांबून त्यांना पुन्हा पृथ्वीवर परतायचे होते. जूनमध्ये त्यांनी परत येणे अपेक्षित होते. मात्र, थ्रस्टर आणि हिलियम लीक झाल्यामुळं ते तिथेच अडकून पडले आहेत. अंतराळात आणि पृथ्वीवरही इंजिनिअर ही समस्या ठीक करण्यासाठी आणि अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्यासाठी मेहनत घेत आहेत.