Sunny Leone कडून Turkey-Syria भूकंपग्रस्तांना मदतीचा हात
निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey)
Sunny Leone and Her husband Daniel Weber Will Help Earthquake Affected In Syria-Turkey people : निसर्गाचा कोप होतो तेव्हा तंत्रज्ञानही त्याच्यापुढे हात टेकतं. हेच तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपात पाहायला मिळालं. तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. आता या प्रभावातून हा देश लवकरात लवकर बाहेर आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुर्की आणि सीरियाच्या स्थितीवर दु:ख व्यक्त केले. आता अभिनेत्री सनी लिओनीनं तुर्की आणि सीरियाला मदतीचा हात पुढे केला आहे. (Earthquake in Syria-Turkey)
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आणि तिचा पती डॅनियल वेबरनं (Daniel Weber) तुर्कीतील पीडितांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोघांनी फेब्रुवारी महिन्यातील त्यांच्या कॉस्मेटिक ब्रँडच्या कमाईची 10 टक्के रक्कम ही सीरिया आणि तुर्कीमधील भूकंपग्रस्त लोकांसाठी मदत म्हणून देऊ केली आहे.
सनी लिओन म्हणाली की प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे आणि लोकांना 'जे लोक वाचले आहेत त्यांना पुन्हा त्यांचं जीवन सुरु करण्यासाठी मदत करा'असे आवाहन तिने केले. हे दोघे आपली कमाई सीरिया आणि तुर्कीमधील प्रभावित भागात राहणाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देतील.
हेही वाचा : 'आता हिनं हद्दच पार केली', Urfi Javed चा ट्रान्सपरेंट बिकीनीतील लूक पाहता नेटकरी हैराण
याआधी प्रियांका चोप्रानं भूकंपानंतर पीडितांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले होते. 'एक आठवड्यानंतर, विनाशकारी भूकंपानंतर तुर्की आणि सीरियाच्या लोकांना वेदना आणि त्रास होत आहे. बचाव कार्य न थांबता सुरू आहे, ज्यामुळे असे काही आशादायक क्षण आले जेथे 3 महिन्यांच्या बाळाला ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना आपली गरज आहे. तर आपण पुढे येऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कारण त्यात असे बरेच लोक आहेत. जे अडकले आहेत आणि ते मदत मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. त्यांचं कुटुंबा अचानक काही तरी व्हावं आणि त्यांना मदत मिळावी अशी प्रार्थना करत आहेत. मला आशा आहे की तुम्ही जितकी मदत करू शकता तितकी करण्याचा प्रयत्न कराल.