मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की काढावा यामुळे नातं आणखी खुलतं. परंतु आपल्या गर्लफ्रेंडसोबत एकांतात वेळ घालवणं एका अभिनेत्याला महागात पडलं आहे. हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर गार्नरसोबत हा सगळा प्रकार घडला. त्यांच्या १० वर्षांचा मुलगा सॅम्युअल गार्नर ऍफ्लेक याचा अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन आणि त्याची गर्लफ्रेंड जेनिफर लोपेझ जी एक गायिका आणि अभिनेती आहे. ते दोघेही सैम्युअल सोबत सहलीला गेले होते. लॉस एंजेलिसमधील लॅम्बोर्गिनी येथील डीलरशिप आउटलेटमध्ये हे तिघे एकत्र गेले होते. त्याचवेळी सॅम्युअलसोबत कारचा अपघात झाला आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ लॉस एंजेलिसमध्ये एका लक्झरी कार रेंटल डीलरशिपवर होते तेव्हा बेन ऍफ्लेक एका डीलरशी बोलण्यात व्यस्त हाते. तसचे तो आपल्या गर्लफ्रेंड सोबत देखील काही खासगी क्षण घालवत होता.



यादरम्यान सॅम्युअल लॅम्बोर्गिनी उरूसच्या ड्रायव्हर सीटवर गेला. तेव्हा त्याच्याकडून गाडी सुरु झाली आणि ती मागे उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूला धडकली.


जेव्हा हा एक्सिडंट घडला तेव्हा बेन त्याची गर्लफ्रेंड जेनिफर लोपेझसोबत वेळ घालवत होता असे सांगितले जात आहे आणि त्यासंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. परंतु तो व्हिडीओ त्याच वेळेचा आहे का? हे अजून समोर आलेलं नाही.



नशीबाने या काळात कोणतीही जीवित झाली नाही. परंतु  बेन ऍफ्लेकचे आर्थिक नुकसान नक्कीच झाले.


सॅम्युअल हा बेन ऍफ्लेक आणि अभिनेत्री जेनिफर गार्नरचा लहान मुलगा आहे. सॅम्युअलला दोन मोठ्या बहिणी आहेत - व्हायलेट ऍनी आणि सेराफिना रोज एलिझाबेथ.


2005 मध्ये बेन आणि जेनिफरचे लग्न झाले. परंतु 2018 मध्ये दोघेही वेगळे झाले. परंतु बेनने नुकतेच जेनिफर लोपेझसोबत आपलं नातं पुन्हा सुरू केलं आहे. 


काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, या दोन स्टार्सनी पुन्हा एंगेजमेंटही केली आहे, पण काही कारणास्तव ते लग्न करू शकले नाहीत.