जगातील अनोखा देश येथे लोक फिरण्यासाठी नाही तर झोपण्यासाठी जातात; कारण जाणून थक्क व्हाल

sweden : जगात एक असा अनोखा देश आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी नाही तर शांत झोप काढण्यासाठी येतात. या देशात सध्या स्पील टूरीजमचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे.
Sleep Tourism: जगभरातील अनेक देश पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये आहेत. येथे फिरण्यासाठी पर्यटक आतुर असतात. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी नाही तर शांत झोप काढण्यासाठी जातात. हे देश सध्या स्पील टूरीजमसाठी (Sleep Tourism) चांगलाच लोकप्रिय होत आहे. जाणून घेऊया हा देश कोणता?
जगभरात सध्या टूरीजमचे अनेक ट्रेंड लोकप्रिय होत आहेत. अशातच आता स्पील टूरीजम देखील चांगलाच लोकप्रिय होत आहे. स्लीप टूरीजमसाठी सध्या स्वीडन या देशाला खूप पसंती मिळत आहे. स्वीडन (sweden) हळूहळू 'स्लीप टुरिझम'साठी जागतिक डेस्टिनेशन बनत आहे. शांत आणि निवांत झोप घेण्यासाठी जगभरातून पर्यटक स्वीडनमध्ये येत आहेत.
सध्या धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप मिळत नाही. माईंड रिफ्रेश करण्यासाठी नुसती झोप घेऊन उपयोग नाही. शांत झोप गरजेची आहे. शांत झोप मिळवण्यासाठी तशा प्रकारचे शांत वातावरण मिळणे देखील फार गरजेचे आहे. स्पील टूरीजमचा प्लान आखणारे जगभरातील 65 टक्के पर्यटक यासाठी स्वीडनची निवड करत आहेत.
स्वीडनमध्ये अशी अनेक अतिशय शांत ठिकाणं आहेत. येथील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आणि थंड प्रदेश लोकांना मानसिक शांती देतात. इथे तणावातून मुक्ती मिळते. येथे निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटक शांत झोपेचा अनुभव घेत आहेत. एका रिपोर्टनुसार स्वीडनमध्ये स्लीप टुरिझम या संकल्पनेत कोणतीही विशेष थेरपी वापरली जात नाही. येथे येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही विशेष लक्झरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. त्याऐवजी, येथे ग्रामीण जीवनशैलीप्रमाणे निसर्गाशी जवळीक साधता येतील अशा प्रकारच्या सुविधा पर्यटकांना दिल्या जातात.
स्वीडनमध्ये Svartso नावाचे एक छोटेसे गाव आहे. येथे फक्त 65 लोक राहतात. या गावातील दऱ्या एवढ्या शांत आणि नयनरम्य आहेत की जगभरातून लोक इथे येतात फक्त शांत झोप आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी येतात. हे गाव शहरी जीवनातील गर्दी आणि तणावापासून दूर अनोखी शांतता देणारे आहे.ब्लॅकआउट रूम्स, मोबाईल-फ्री वेलनेस एरिया आणि स्लीप-प्लेलिस्ट अशा सुविधा देतात.