शेक्सपियरचे नावात काय आहे? असे एक प्रसिद्ध वाक्य आहे. पण ही बातमी वाचल्यानंतर तुम्हीसुद्धा म्हणाल की असं नाव का आहे? कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्याचे वडिलोपार्जित गाव (Village) असते. गावाशिवाय आपली ओळख नसते. देश, शहर, गाव इत्यादींच्या नावांचा स्वतःचा इतिहास असतो. लोक त्याच्याबद्दल अभिमानाने बोलतात. पण एक गाव असंही आहे, ज्यामुळे लोकांना लाज वाटतेय. सोशल मीडियाच्या (Social Media) या जमान्यात यामुळे ब्लॉक (Block) होण्याचाही धोका आहे. हे खरे आहे. जगात असं एक गाव आहे, ज्याचं नाव आपण बोलूही शकत नाही आणि लिहूही शकत नाही. त्यामुळे या गावातील रहिवासी चिंतेत आहेत. (shame in speaking this name village people are upset with the name)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, स्वीडनमधील (sweden) या विचित्र गावाचे नाव Fucke आहे. या नावाने येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत. सोशल मीडियाच्या ठरवून दिलेल्या नियमांनुसार, या शब्दाचा वापर करता येत नाही. या कारणामुळे या गावातील लोकांना आपल्या गावाचे नाव फेसबुकवर (Facebook) लिहिता येत नाही. असे केल्याने त्यांना ब्लॉक देखील केले जावू शकते.


माध्यमांच्या वृत्तानुसार, गावकऱ्यांना त्यांच्या गावाचे नाव बदलायचे आहे. यासाठी स्थानिक न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्यावर निर्णय येणे बाकी आहे. स्वीडनमध्ये Cultural Environment Act या कायद्यानुसार गावाचे नाव बदलता येते. सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सांस्कृतिक विभाग या गावाचे नाव बदलणार आहे. येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.


हे गाव सुखी आणि शांत आहे. मात्र या नावामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. आपल्या गावाचे नाव सोशल मीडियावर लिहिता येत नाही, असे या गावातील लोकांचे मत आहे.