नवी दिल्ली : सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस प्रचंड चिघळत चालला असून, या संघर्षात मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर गेला आहे. त्यामुळे संतापलेल्या लष्कराने बंडखोरांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. तसेच, बंडखोरांचा संपर्कही लष्कराने तोडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, गेल्या २० दिवसात बंडखोर विरूद्ध लष्कर या संघर्षाने १ हजारांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे. सरकारी सैनिक आणि सहकारी मिलिशिया यांनी १८ फेब्रुवारीपासून पूर्व घोऊतासाठी सुरू केलेल्या लष्करी कारवाईत आर्धी लढाई जिंकली आहे. मात्र, यात प्रचंड हिंसा आणि रक्तपात होताना दिसत असून, जगभरातूनही या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


फोडा आणि आक्रमण करा अशी रणनिती वापरत बंडखोरांनी अनेक परिसरांवर कब्जा मिळवला आहे. मात्र, बंडखोरांना जेरीस आणण्यासाठी लष्कराने डूमा प्रांतातील मुख्य़ शहर असलेल्या ओऊताचा संपर्क तोडला आहे. या संघर्षयुद्धावर बारीक नजर ठेऊन असणाऱ्या सीरियन ऑब्जरवेटरी फॉर ह्युमन राईट्सनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून, लष्करी प्रशासनाने पश्चिमेकडील हरास्ता शहरासोबतच डुमाचा संपर्क तोडला आहे. तसेच, मसराबा शहरावर कब्जाही मिळवला आहे.