मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कठोर पाऊल उचलली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेत वाढत चाललेल्या बंदूक संस्कृतीला लगाम लावण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पावलं उचलली आहेत. अमेरिकेतील शाळांमध्ये होणारा बंदुकीचा शिरकाव आणि 14 फेब्रुवारीला एका शाळेत घडलेल्या हत्याकांडात गेलेले 17 बळी याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा मुद्दा जोरदार लावून धरलाय.


काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प


बुधवारी आयोजित केलेल्या बंदूक धोरणावरच्या खुल्या चर्चेत ट्रम्प यांनी बंदूक संस्कृतीला आळा घालण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केलीय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना एकत्र ऑन कॅमेरा चर्चेला बोलावून ट्रम्प यांनी या मुद्द्याला हात घातलाय. बंदूकीची परवाना मिळण्याचं वय 18 वरून 21 करण्याचा प्रस्तावही ट्रम्प यांनी मांडला. या चर्चेला 17 सिनेटरसह रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य उपस्थित होते.