बॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक कथित व्हिडीओमध्ये तालिबानचा एक प्रमुख नेता त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे तालिबानमध्ये खळबळ उडाली आहे.
Taliban : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा मिळवण्यापासून बरेच निर्बंध लावले आहेत. यामध्ये महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वांनाच अनेक निर्बंधांमध्ये तालिबानी सरकारने गुंतवून ठेवलं आहे. नियम मोडल्यामुळे अनेक वेळा मानवी हक्कांचे (Human Rights) उल्लंघन करत शिक्षा देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनैक महिलांना क्रूरपणे शिक्षा देणारे तालिबानी नेते मात्र या सर्व नियमांना बगल देत असल्याचे समोर आलं आहे. महिलांवर विविध निर्बंध लादणाऱ्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तालिबानच्या एका प्रमुखे नेत्याचा एक खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये, तालिबानचा उपप्रमुख आणि काबुलमधील दा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकतचा (DABS) प्रमुख मुल्ला अहमद अखुंद (Mullah Ahmed Akhund) याने त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका गादीवर मुल्ला अहमद अखुंद एका तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे म्हटलं गेलं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
कथित व्हायरल व्हिडिओमध्ये मुल्ला अहमद अखुंद याच्यासोबत झोपलेला तरुण हा त्याचा अंगरक्षक आहे. अफगाणिस्तान इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार या 21 वर्षीय अंगरक्षकाने ब्रेश्ना शेरकतमध्ये मुल्ला अहमद अखुंदसोबत काम केले होते. या संघटनेचा उपसंरक्षण मंत्री मुल्ला फाजील याच्यासोबतही हा तरुण दिसला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याची जगभरात चर्चा सुरु झाली आहे.
दुसरीकडे, हा व्हिडीओ समोर आल्यापासून तालिबानचे नेतृत्व आणि त्यांचे संबंध यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बहुतेक तालिबानांनी किशोरावस्थेपासून समलैंगिक संबंध ठेवले आहेत. अफगाण समाजात मुलांवर अत्याचार करणे सामान्य आहे. तिथे बालविवाह ही एक सामान्य प्रथा आहे. हा एक कुजलेला समाज आहे. मदरशांमध्ये वयाच्या नवव्या वर्षापासून मुलांशी गैरवर्तन केले जाते. त्यांना दाढी नसलेली मुलं आवडतात, अशा प्रतिक्रिया ट्विटर युजर्सकडून दिल्या जात आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही तालिबान नेतृत्वाने मुल्ला अहमद अखुंदला कोणतीही शिक्षा दिलेली नाही. तसेच त्याला त्याचे काम करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे ह्युमन राइट्स वॉच आणि आउट राइट ऍक्शन इंटरनॅशनलने जारी केलेल्या जानेवारी 2022 च्या अहवालात असेही म्हटले आहे की समलिंगी, उभयलिंगी याशिवायही भिन्न लैंगिक भावना बाळगणाऱ्या अफगाणी व्यक्तींच्या जीवाला तालिबानी राजवटीत धोका आहे.