स्टुडिओ घुसले आणि थेट अँकरच्या डोक्यावर ताणली बंदूक...पुढे काय झालं पाहा व्हिडीओ
खांद्यावर बंदूक रोखली आणि वाचायला सांगितलं... LIVE TVमध्ये जगात पहिल्यांदाच असा प्रकार घडला, पाहा थरारक व्हिडीओ
काबुल: कोण जर आपल्या डोक्यावर बंदूक ताणली आणि जबरदस्ती काम करवून घेतलं तर आपली अवस्था काय होईल? हा नुसता विचार करूनच घाम फुटेल पण इथे तर प्रत्यक्षात स्टुडिओमध्ये बंदूक घेऊन दोन माणसं घुसली. त्यांनी अँकरच्या डोक्यावर बंदूक ताणली आणि बातम्या वाचायला सांगितल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती भीषण आहे. एकीकडे तालिबान विरुद्ध ISIS सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे तालिबान्यांची अफगाण नागरिकांवर सुरू असलेली दादागिरी. तिथल्या मीडियावरही त्यांनी कब्जा मिळवला आहे. तालिबानी आता मीडियाच्या स्टुडियोमध्येही घुसले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता टीव्ही अँकरच्या मागे बंदूक घेऊन उभे आहेत. अशा अवस्थेत टीव्ही अँकर बातम्या वाचत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून तिथे काय परिस्थिती असेल त्याचा अंदाज येईल.
या व्हिडीओमध्ये हा न्यूज अँकर इस्लामिक अमिरातींना सपोर्ट करण्याचं आवाहन करत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ 9 लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तिथे महिलांना एकटं फिरण्याची परवानगी नाही. याशिवाय महिलांवरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. या व्हिडीओवरून सध्या तिथे काय स्थिती असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.