काबूल : Taliban new plan : अफगाणिस्तानवर (Afghanistan) बंदुकीच्या जोरावर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने (Taliban) आपल्या अंतरिम सरकारची घोषणा केली आहे आणि 11 सप्टेंबर रोजी शपथ घेऊ शकते. प्रत्येकाला हे ऐकून आश्चर्य वाटते की तालिबानने शपथविधीसाठीही हा दिवस का निवडला आहे. कारण ही एक अशी तारीख आहे, ज्यावर फक्त दहशतवाद्यांना अभिमान असू शकतो. (Afghanistan Updates)


11 सप्टेंबर अमेरिकेला आव्हान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 सप्टेंबरची ही तारीख महासत्ता अमेरिकेला एक आव्हान आहे, कारण या दिवशी तालिबान सरकारचे शपथविधी अमेरिकेसाठी वर्मीघाव ठरू शकतो. 2001 च्या या दिवशी अमेरिकेच्या जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) ट्विन टॉवर्सवर भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता आणि या दिवशी तालिबान सरकारची स्थापना हे अमेरिकेला थेट आव्हान असणार आहे.


शपथविधीसाठी या देशांना आमंत्रण


वृत्तानुसार, तालिबानच्या अंतरिम सरकारने शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चीन, तुर्की, पाकिस्तान, इराण आणि कतारसह विविध देशांसह भारत आणि अमेरिकेला आमंत्रणे दिली आहेत. तालिबान आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवू पाहत आहे आणि इतर देशांना त्यांचे दूतावास पुन्हा उघडण्यास सांगितले आहे.


तालिबानने दहशतवाद्यांना मंत्री केले


मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान आणि अब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. तालिबान सरकारमध्ये एकूण 33 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी बहुतेक आंतरराष्ट्रीय स्तरावर मोस्ट वॉन्टेड आहेत आणि त्यांच्यावर बक्षीस लावण्यात आले आहे. होणारे पंतप्रधान मुल्ला हसन अखुंद यांच्यावर संयुक्त राष्ट्रांने बंदी घातली आहे. कार्यवाहक गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी एफबीआयच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत आणि त्यांच्यावर 10 दशलक्ष डॉलर किंवा सुमारे 73 कोटी रुपयांचे बक्षीस आहे. शरणार्थी मंत्री खलील हक्कानीवर 50 लाख डॉलर अर्थात सुमारे 36.5 कोटी रुपयांचे बक्षीस आहे.