वॉशिंग्टन : हसल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात. हसल्यामुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच आपण नेहमी फ्रेश राहतो. पण हसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. मेक्सिकोमध्ये सुट्टीसाठी आलेल्या एका महिला शिक्षिकेचा हसता-हसता अचानक मृत्यू झाला आहे.


अमेरिकेतील पेनसिल्वेनिया येथील चार्ल्स ए ह्यूस्टन मिडल स्कूलमध्ये शेरॉन रेगोली सिफेरनो या शिक्षिका आहेत. त्या सुट्टीनिमित्त आपल्या मित्राकडे आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलगीही होती.


मित्राकडे गेल्यावर सर्वजण घराच्या टेरेसवर गेले. मग, सुरु झाल्या गप्पा. गप्पा मारता मारता सिफेरनो या बालकनीच्या कड्यावर जाऊन बसल्या. गप्पा मारताना हसता-हसता सिफेरनो यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. 


त्यांच्यासोबत असलेल्या मित्र-मैत्रिणी घटनेनंतर गोंधळून गेल्या. त्यांनी तात्काळ अॅम्ब्युलन्सला फोन केला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी शिक्षिकेला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनीही त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र, दुर्दैवाने शिक्षिकेचा मृत्यू झाला.