Rolls Royce : कार चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. कार चोरण्यासाठी चोरटे अनेक क्लुप्त्या लढवतात. बनावट चावीच्या मदतीने, स्क्रू डायव्हर किंवा पीनच्या मदतीने चारचाकी गाड्या चोरल्या चोरताना आपण पाहिलं असेल. पण सोशल मीडियावर सध्या एका हायटेक चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चोरटे हायटेक पद्धतीचा वापर करत अवघ्या 30 सेकंदात महागडी रोल्स रॉईस चोरतना दिसतायत. एंटिनाचा चावी सारखा वापर करत चोरट्याने 15 कोटी रुपयांची Rolls Royce उडवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जितकी महागडी कार तितकी अधिक सुरक्षित असं म्हटलं जातं. पण चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षेच्या हमीचे पार तीनतेरा वाजवल्याचं या व्हिडिओत दिसतंय. केवळ एंटिनाच्या मदतीने चोरट्याने कारची चोरी केली. चोरीचा हा प्रकार पाहून पोलीसही हैराण झाले आहेत. 


काय आहे नेमकी घटना?
चोरीचा हा प्रकार ब्रिटेनच्या एवले इथं झाला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत हुडी घातलेले दोन चोर दिसतायत. एक चोर कारच्या आत बसलाय तर दुसरा चोर हातात एंटिना घेऊन उभा आहे. हातात एंटिना घेतलेला चोर कारच्या समोर उभं राहिलेला दिसतोय, एकदोन पावलं पुढे चालताच कार आपोआप चालू होते. यानंतर दोघंही महागडी कार घेऊन पसार होतात. 


Rolls Royce Cullinan किंमत किती आहे?


Rolls Royce Cullinan एसयुव्ही कार आहे. जगातील महागड्या कारपैकी ही एक कार आहे. भारतात या कारच्या किंमतीची सुरुवात 8 कोटी रुपयांपासून 15 कोटी रुपयांपर्यंत आहे. यात कस्टमायजेशनचा पर्यायही उपलब्ध आहे. 



Keyless फिचरचा तोटा
या हायटेक चोरीत चोरट्यांनी Keyless चावीच्या फिचरचा वापर केला आहे. सध्या अनेक आधुनिक कारमध्ये हे फिचर आहेत. कारची प्रगत संगणक प्रणाली  Key Fob संबंधीत आहे. कारची चावी गाडीच्या आसपास असल्यास ती Key Fob ला डिटेक्ट करते. यानंतर कारमध्ये असलेला अनलॉक आणि स्टार्ट करण्याचा पर्याय आपोआप सुरु होतो.