Iran: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार, Firingच्या दहशतीने मोठी घबराट
Iran Police Open fire: मेट्रो स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच घरबाट पसरली आहे. इराण पोलिसांकडून हा गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि त्यांच्यावर लाठीमार केला.
Firing on Tehran Metro Station: इराणमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. (Iran Tehran Metro Station Fire) या गोळीबारानंतर स्टेशन परिसरात मोठी घबराट पसरली आहे. तेहरान मेट्रो स्टेशन आणि सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी देखील हल्लेखोरांवर गोळीबार केला. हिजाबविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर हा गोळीबार करण्यात आला आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारलेली नाही. (Iranian police open fire at Tehran metro station and beat women on train)
पोलिसांचा महिलावर लाठीमार
इराणमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला असून आंदोलक सातत्याने निदर्शने करत आहेत. दरम्यान, तेहरानमधील मेट्रो स्टेशनवर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला आणि त्यांना लाठीमार केला. गोळीबारानंतर गोंधळ उडाला आणि यावेळी मोठी चेंगराचेंगरीही झाली. 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूच्या विरोधात मेट्रो स्टेशनवर लोकांचा जमाव आला आणि ते निदर्शने करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इराणी पोलिसांनी तेहरान मेट्रो स्टेशनवर गोळीबार केला आणि ट्रेनमधील महिलांना मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिसांनी गर्दीच्या प्लॅटफॉर्मवर गोळीबार केल्यानंतर प्रवासी बाहेर पडण्याच्या दिशेने धावत असल्याचे दिसत होते. तर महिलांना लाठीमार करत पोलिसांचे पोलीस दिसत आहे. (अधिक वाचा - IPL-2023 : विराट कोहलीच्या टीममध्ये आता 'हा' स्टार ऑलराऊंडर? एका पार्टीत फॅक्चर झाला होता पाय )
हिजाब वादानंतर इराणमध्ये मोठा तणाव
हिजाबच्या वादावर गेल्या काही दिवसांपासून इराणमधील विविध शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. 13 सप्टेंबर रोजी पोलिसांनी मेहसा अमिनी नावाच्या मुलीला तीन दिवसांपासून हिजाब न घातल्याबद्दल अटक केली होती, त्यानंतर तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आणि महिलांनी सार्वजनिकपणे त्यांचे हिजाब जाळण्याशिवाय केस कापण्यासाठी रस्त्यावर उतरले.
हिजाबवादानंतर इराणमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या आहेत. अलीकडच्या काळात इराणमध्ये देशव्यापी निदर्शने होत आहेत, सुरक्षा दलांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे. या निदर्शनांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक चकमकीही झाल्या आहेत आणि होत आहेत.
गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
दक्षिण-पश्चिम इराणमधील इझेह शहरातील (Izeh City) एका बाजारपेठेत बुधवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निदर्शक आणि सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात किमान पाच जण ठार झाले. या घटनेत अनेक जण जखमीही झाले आहेत. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने सांगितले की, काही अज्ञात बंदूकधारी दुचाकीवरुन आले आणि त्यांनी सुरक्षा दल आणि आंदोलकांवर गोळीबार सुरु केला. मात्र, या हल्ल्याचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही आणि अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.