...अन् बुरखा काढून ती अंडरपँट, ब्रामध्ये फिरु लागली; इस्लामिक देशातील Video ने जग हादरलं
Iranian Woman Viral Video: इराण हा महिलांसाठी अनेक निर्बंध असलेला देश म्हणून जगभरात ओळखला जातो. या ठिकाणी महिलांना हिजाब परिधान करणं बंधनकारक आहे. असं असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Iranian Woman Viral Video: इराणमध्ये महिलांकडून मागील बऱ्याच काळापासून हिजाबला विरोध होत असताना दिसत आहे. इराणमधील महिलांवर असणारं हिजाबचं बंधन सध्या पुन्हा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. येथील एका तरुणीने या बळजबरीला विरोध करत अनोख्या पद्धतीने नोंदवलेला निषेध जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. हिजाबच्या सक्तीला विरोध करण्यासाठी एक तरुणी आपल्या अंगावरील दोन कपडे वगळता सर्व कपडे काढून सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना दिसली. सध्या इराणमधील हुकुमशाही पद्धतीच्या वर्तवणुकीविरोधात महिलांनी उचलेलं हे सर्वात मोठं पाऊल असल्याचा दावा करत या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ जगभरामध्ये शेअर केले जात आहेत.
अर्धनग्नावस्थेत सार्वजनिक ठिकाणी
सोशल मीडिया तसेच स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमध्ये महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी कपडे परिधान करण्याचे नियम हे फारच कठोर आहेत. या ठिकाणी महिलांनी सार्वजनिक ठिकाणी योग्य पद्धतीने कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मॉरल पोलीस नियुक्त केले जातात. महिलांच्या शरीराचा एखादा भाग जरी दिलसा तरी त्यांना या मॉरल पोलिसांकडून दंड केला जातो किंवा शिक्षा केली जाते. अशाच ड्रेस कोडला विरोध करण्यासाठी इराणमधील एका विद्यापिठातील महिलेने चक्क अर्धनग्नावस्थेत सार्वजनिक ठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तेहरान विद्यापीठामधील एका तरुणीला हिजाबच्या मुद्द्यावरुन मॉरल पोलिसांच्या तुकडीने हटकले. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने विरोध केला. या झटापटीमध्ये तिचा बुरखा फाटला. या प्रकारामुळे चीड आलेल्या तरुणीने असल्या निर्बंधांना विरोध करण्यासाठी आपली पॅण्टही काढली आणि ती सार्वजनिक ठिकाणी आधी बराच वेळ अंडरपँट आणि ब्रा घालून बसून राहिली. त्यानंतर ती बराच वेळ या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजोब यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन, "पोलीस स्थानकामध्ये या मुलीला मानसिक समस्या असल्याचं समोर आलं आहे," असं सांगितलं.
यासारखी वाईट गोष्ट नाही
अनेकांनी या महिलेला कोणताही मानसिक आजार नसून तिने बुरख्यासंदर्भातील कठोर निर्बंधांना विरोध करण्यासाठी हिजाब फाटल्यानंतर आपली पॅण्ट काढून विरोध नोंदवल्याचा दावा केला आहे. एका महिलेने या व्हिडीओवर कमेंट करताना, "सार्वजनिक ठिकाणी महिलेला अंडरपॅण्टवर फिरावं लागण्यासारखी कोणतीही वाईट गोष्ट नाही. हिजाबची बंधनं घालणं हे अधिकाऱ्यांच्या मूर्खपणाचं लक्षण आहे," असं म्हटलं आहे.
प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?
प्रत्यक्षदर्शिंनी सांगितलेल्या माहितीनुसार, "शनिवारी, 2 नोव्हेंबर रोजी आम्ही विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आणि बसिरा तुकड्या (मॉरल पोलीस) एका विद्यार्थिनीला खेचक सुरक्षा कक्षात नेत होते. तिने हिजाब योग्य पद्धतीने परिधान न केल्याचा दावा केला जात होता. मात्र या विद्यार्थिनीने सुरक्षा रक्षकांना विरोध केला. या साऱ्या गोंधळात तिचा हिजाब फाटला. त्यामुळे तिची अंतर्वस्र दिसली. या प्रकारामुळे घाबरलेल्या सुरक्षारक्षकांनी या तरुणील जाऊ दिलं. मात्र संतापलेल्या तरुणीने आपली पॅण्ट काढली आणि ती चौकात बसून राहिली."
या महिलेचं पुढे काय होणार?
मात्र ही महिला कोण आहे? तिने असं का केलं याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही. इराणमधील हमसहारी या वृत्तपत्राच्या वेबसाईटवरील वृत्ता, "या विषयासंदर्भातील एका जाणकार व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला गंभीर मानसिक आजार असल्याचा दावा केला आहे. तपासणीनंतर तिला एखाद्या मनोरुग्णालयामध्ये हलवलं जाईल," असं म्हटलं आहे.