जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाने (Tesla) चालण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पैसे कमावण्याची एक चांगली संधी दिली आहे.  यासाठी दिवसातून 7 चास चालावं लागणार आहे. यावेळी एका तासासाठी 48 डॉलर्स म्हणजेच 4 हजार रुपये दिले जात आहेत. टेस्लाच्या ह्युमनॉइड रोबोट ऑप्टिमसच्या भाग म्हणून ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मोशन-कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर करून रोबोटला प्रशिक्षण देण्याच्या उद्देश आहे. या संधीचा फायदा घेत लोक दिवसाला 28 हजार रुपये कमावू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी 2021 मध्ये ऑप्टिमसची संकल्पना प्रथम मांडली होती.  फॅक्टरी कामापासून ते काळजी घेण्यापर्यंतची कार्ये करण्यास सक्षम असलेला बहु-कार्यक्षम रोबोट तयार करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षभरात, टेस्लाने मोशन-कॅप्चर सूट्सद्वारे ऑप्टिमसच्या प्रशिक्षणात मदत करण्यासाठी असंख्य कामगारांची नियुक्ती करून आपले प्रयत्न वाढवले ​​आहेत.


Data Collection Operator असं या पोस्टला नाव देण्यात आलं आहे. यामध्ये व्यक्तीला मोशन कॅप्चर सूट आणि व्हर्च्यूअल रिअॅलिटी हेडसेट घालून चाचणी मार्गावरुन 7 तासापेक्षा जास्त काळ चालावं लागेल. यामध्ये डेटाचे संकलन आणि विश्लेषण, अहवाल लेखन आणि उपकरणांसंबंधित टास्कचा समावेश असेल. 


विशेष म्हणजे, जर तुम्हाला ही नोकरी करायची असेल तर त्यासाठी काही शारिरीक अटीही पूर्ण कराव्या लागतील. ज्यामध्ये 5'7" आणि 5'11 दरम्यानची उंची, 30 एलबीएस पर्यंत वाहून नेण्याची क्षमता आणि विस्तारित कालावधीसाठी VR उपकरणे चालविण्याची क्षमता समाविष्ट आहे.


वेतनाव्यतिरिक्त टेस्लामध्ये ज्यांना नोकरी मिळते त्यांना पहिल्या दिवसापासून सर्वसमावेशक वैद्यकीय, दंत आणि दृष्टी योजना, कुटुंब-निर्माण समर्थन आणि सेवानिवृत्ती लाभांसह अनेक फायदे मिळतात. कंपनी टेस्ला बेबीज प्रोग्राम, वजन कमी करणे आणि तंबाखू बंद करण्याचे कार्यक्रम आणि विविध विमा पर्याय यासारखे इतर लाभदेखील देते.


या पदासाठी वेतन श्रेणी 25.25 ते 48 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 2,120 ते 4,000 रुपये प्रति तास आहे, उमेदवाराचा अनुभव, कौशल्यं आणि लोकेशन यावर हे अवलंबून आहे. यामध्ये रोख आणि स्टॉक पुरस्कारांचा देखील समावेश आहे, ज्यामुळे रोबोटिक्स आणि एआय विकासाच्या अत्याधुनिक क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही एक आकर्षक संधी आहे.


कंपनीने या नोकरीत वेगवेगळ्या शिफ्ट असतील हे स्पष्ट केलं आहे. सकाळी 8 ते दुपारी 4:30 किंवा दुपारी 4 ते रात्री 12.30 किंवा रात्री 12 ते  सकाळी 8 अशा शिफ्ट आहेत. तुम्ही टेस्लाच्या करिअर पेजवर याची सविस्तर माहिती मिळवू शकता. पण ही नोकरी पालो अल्टो, कॅलिफोर्निया येथे आहे हे लक्षात ठेवा.