अमेरिकेत चर्चमध्ये गोळीबार, हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू
अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने चर्चमध्ये गोळीबार केला आहे. अंदाधुंद केलेल्या या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने चर्चमध्ये गोळीबार केला आहे. अंदाधुंद केलेल्या या गोळीबारात २७ जणांचा मृत्यू झाला आहे.
या गोळीबारात २७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्लेखोराने चर्चमध्ये आलेल्या नागरिकांना आपलं लक्ष्य केलं.
अंदाधुंद गोळीबार करणारा आरोपी ठार झाला आहे. मात्र, त्याला पोलिसांनी मारले की त्याने स्वत:च गोळी झाडून घेतली यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये.
या घटनेनंतर टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विट केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.