नवी दिल्ली : आपल्या दैनंदिन आयुष्यात ब्लेडचा वापर आपण करत असतो. पण या ब्लेडच्या मध्यभागी असलेल्या आकारासंदर्भात तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या मागचं रहस्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं पहायला गेलं तर, आपण खासकरुन पुरूष रेजर ब्लेडचा उपयोग दाढी करण्यासारख्या कामांसाठी वापरतात. तसेच इतरही कामं ब्लेडच्या सहाय्याने होतात. मोठ्यातलं मोठं काम हे छोटसं ब्लेड अगदी सहज करतं. पण या ब्लेडचं डिझाईन असं का आहे? यासंदर्भात खूपच कमी जणांना माहिती आहे. चला तर मग पाहूयात या डिझाईन मागचं कारणं...


१९०४ मध्ये जिलेट कंपनीने आपलं पहिलं ब्लेड लॉन्च केलं. हे ब्लेड रेजरमध्ये बोल्टच्या सहाय्याने फीट करावं लागत असे. त्याकाळात हे पेटंट केवळ जिलेट कंपनीजवळ होतं आणि तेच त्या काळात अशा प्रकारचे ब्लेड्स बनवत होते.


पण, २५ वर्षांनंतर हे पेटंट संपुष्टात आलं आणि त्यामुळे इतरही कंपन्यांना या डिझाईन्सच्या ब्लेड्स बनवता आल्या. हळूहळू हा एक ट्रेंन्ड बनला.


या आगळ्यावेगळ्या डिझाईनमागे कारणंही तसं खास आहे. जे ब्लेड बनवलं होतं ते ०.२०mm चं होतं. इतकी पातळ ब्लेड असल्याने थोडाजरी झटका लागला तरी ते ब्लेड तुटायचं. त्यामुळे त्याला फ्लेक्झिबिलिटी देण्यासाठी अशा प्रकारचा आकार देण्यात आला. या आकारामुळे ब्लेडला फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि ब्लेड सहसा तुटत नाही.