पृथ्वीवर 20 हजार वर्षापूर्वी कोरोनाने घातलं होतं थैमान? 42 जीनच्या लोकांमध्ये कोरोनाशी अनुकूलन साधण्याची क्षमता
जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरसने 20 हजार वर्षापूर्वीसुद्धा पृथ्वीवर थैमान घातले होते. या खतरनाक वायरसचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हिएतनामच्या लोकांच्या डीएनएमध्ये सापडले आहेत
कॅनबरा : जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरसने 20 हजार वर्षापूर्वीसुद्धा पृथ्वीवर थैमान घातले होते. या खतरनाक वायरसचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हिएतनामच्या लोकांच्या डीएनएमध्ये सापडले आहेत. ऑस्ट्रेलिएन नॅशनल विद्यापठाच्या यासिने सौइल्मी आणि रे टॉबलर यांनी म्हटले आहे की, आधुनिक जगातील 42 जीनच्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसशी अनुकूलन साधणारे पुरावे मिळाले आहेत.
कोरोनामुळे जगभरात 38 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरस सार्स-सीओवी -2 मुळे कोविड 19 वैश्विक महामारीने 38 लाख लोकांचा बळी घेतला आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अनुवांशिक पुराव्याचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण मिळवता येऊ शकते. जागतिक महामारी मानवी इतिहासाएवढी पुरातन आहे. यापुर्वी देखील मानवाने या महामारीचा सामना केला होता.
प्राचीन कोरोना वायरसचे निशाण
जगभरातील 26 देशांमधील 2500 पेक्षा अधिक लोकांच्या जीनोमवर संशोधन केले. त्यात मानवाच्या 42 वेगवेगळ्या जीनमद्ये अनुकूलनाचे पुरावे मिळाले आहेत. हे जीन फक्त पाच स्थानांच्या लोकांमध्ये मिळाले. हे सर्व स्थानं पूर्व आशियातील होते.
आपले पूर्वज याआधीसुद्दा कोरोनाच्या संपर्कात आले आहेत. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, आधुनिक पूर्व आशियातील देशांचे पूर्वज साधाराण 25 हजार वर्षापूर्वी कोरोना विषाणूच्या संपर्कात आले येऊन गेले आहेत.