Afghanistan Crisis : अमेरिकन विमानातून पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगतली हृदय हेलावून टाकणारी कहाणी, हात आणि पायही होते गायब
Afghanistan Crisis : तालिबानच्या (Taliban) दहशतीमुळे लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते..
काबूल : Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) दहशतीमुऴे लोकांना देश सोडण्याची घाई झाली आहे आणि जेव्हा त्यांना काबूल (Kabul) विमानतळावरून (Kabul Airport) उड्डाण घेतलेल्या विमानात जागा मिळाली नाही, तेव्हा तीन लोक टायर धरून लटकले होते, मात्र ते खाली पडले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तीन लोक पडताना दिसत आहेत. आता अमेरिकी विमानातून (American plane) खाली पडलेल्या मुलाच्या कुटुंबाने पुढे येऊन त्यांचे मृतदेह सापडल्यावर भयानक स्थितीची बाब उघड केली आहे.
अफगाण राष्ट्रपती अशरफ गनी जवळच्या या 51 लोकांसह पळून गेलेत
लाचे हात पाय गायब झाले होते
हा धक्कादायक क्षण एका व्हिडिओमध्ये चित्रित झाला आहे, ज्यामध्ये 17 वर्षीय रझा (काल्पनिक नाव) हवेत पडताना दिसत आहे. रझाच्या एका नातेवाईकाने सांगितले की त्याचे पाय आणि हात गायब झाले आहेत. मी स्वतः त्याचा मृतदेह परत आणला. सोमवारी सी -17 विमानातून लोकांना पडलेले पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे अवशेष शोधून ते काबूलच्या मुख्य विमानतळावरून बाहेर काढले.
रझासह तिचा भाऊही बेपत्ता
द सनच्या वृत्तानुसार, रझाच्या नातेवाईकाने सांगितले की जेव्हा त्यांनी रझाच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा त्यांना समजले की काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आहे. कारण एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला होता. चिंताग्रस्त कुटुंब त्यानंतर रझा आणि त्याचा 16 वर्षांचा बेपत्ता भाऊ कबीर (काल्पनिक नाव) शोधण्यासाठी विमानतळावर पोहोचले. कुटुंबाने सांगितले की, दोन्ही भाऊ तालिबानपासून वाचण्यासाठी इतके हतबल होते की ते दोघेही सुरक्षितपणे दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.
रझाचा मृतदेह सापडला, कबीर बेपत्ताच
रझाचे अवशेष सापडले आहेत, तर कबीरचे अवशेष अद्याप सापडलेले नाहीत. कुटुंबातील सदस्यांने सांगितेल, 'आम्ही खूप दु:खी आणि अस्वस्थ आहोत, कारण आम्ही आमचे दोन सदस्य गमावले आहेत. आम्हाला त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, परंतु दुसरा अद्याप सापडलेला नाही. नातेवाईक म्हणाले, 'त्यांनी बेपत्ता कबीरचा शोध घेण्यासाठी अनेक रुग्णालयांना भेट दिली आहे, जेणेकरून तो मृत किंवा जिवंत सापडेल. मात्र, आत्तापर्यंत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही.
अफवा ऐकून दोन्ही मुले विमानतळावर पोहोचली
मुलाच्या मृत्यूमुळे त्याची आई खूप अस्वस्थ आहे आणि ती दु:खात बुडाली असल्याचे नातेवाईकाने सांगितले. नातेवाईकांनी सांगितले की, 20,000 निर्वासितांना कॅनडा किंवा अमेरिकेत हलवल्याच्या अफवा ऐकून दोन्ही मुले त्यांच्यासोबत ओळखपत्र घेऊन विमानतळावर पोहोचली होती.
मानवी अवशेष चाकावर अडकलेले आढळले
काबूलवर तालिबानने ताबा मिळाल्यानंतर हजारो लोक 16 ऑगस्ट रोजी आपला जीव वाचवण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचले आणि गोंधळात अनेक लोक तेथून उडणाऱ्या सी -17 मालवाहू विमानात चढले. या दरम्यान, लोक विमानाच्या चाकांवर आणि इतर रिकाम्या ठिकाणी लटकत होते. नंतर अमेरिकेच्या लष्करी विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये मानवी शरीराचे तुकडे सापडले. विमानाच्या व्हील वेलमध्ये मानवी तुकडे सापडल्याची पुष्टी करताना अमेरिकेच्या हवाई दलाने सांगितले की संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.