Kiki Hakansson Passed Away: मिस वर्ल्ड स्पर्धा ही मनोरंजन विश्वातील एक मोठी स्पर्धा मानली जाते. सगळ्या जगाच्या नजारा या स्पर्धेकडे असतात. ही स्पर्धा जिंकणारी स्पर्धक सुपरस्टार बनते. जगातील पहिली मिस वर्ल्ड अर्थात विश्वसुंदरी हा किताब  मिळवणाऱ्या स्वीडिश मॉडेल किकी हॅकन्सन ( First Miss World)  यांनाचीही अशीच ओळख होती. पण सध्या त्याच्याबद्दल एक वाईट बातमी समोर येत आहे.  विश्वसुंदरी हा किताब पहिल्यांदा मिळवणाऱ्या किकी हॅकन्सन यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झालं आहे.


कधी झालेल्या मिस वर्ल्ड? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आता जगाचा निरोप घेतला आहे. कॅलिफोर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


वयाच्या ९५ व्या वर्षी निधन


जगभरातील लाखो मॉडेल्ससाठी प्रेरणास्थान असलेल्या किकी हॅकन्सनच्या मृत्यूची माहिती मिस वर्ल्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे. ज्यामध्ये किकीच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांनी तिच्या फोटोसह दिली आहे. त्या त्यांच्या कॅलिफोर्निया येथील घरी होत्या. किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला पोस्टनुसार, “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा झाली. वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.” 


किकी हॅकन्सन यांनी रचला होता इतिहास


किकी हॅकन्सन  यांनी १९५१ मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा त्या जिंकल्या. किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरु झाली. मिस वर्ल्ड हे या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरुन किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. आम्ही सगळे किकी हॅकन्सन यांच्या दुःखात सहभागी आहोत. आमचं प्रेम, सद्भवाना हे कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासह असेल अशी पोस्ट या पेजवरुन कऱण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी मिस वर्ल्ड हा किताब जिंकण्याआधी मिस स्वीडन हा किताबही जिंकला होता.


 



 


किकी हॅकन्सन यांच्या मुलाने काय म्हटलं आहे?


किकी हॅकन्सन यांचा मुलगा ख्रिस अँडरसन यांनी म्हटलं आहे माझी आई आज जगात नाही, ती खूप दयाळू, प्रेमळ आणि एखाद्या मैत्रिणीप्रमाणे होती. तिची विनोदबुद्धी खूप चांगली होती तसंच ती अत्यंत मोठ्या मनाची होती. तिने जे संस्कार आमच्यावर केले आहेत त्यामुळे आम्हाला कायमच तिची आठवण येत राहिल.”