यरूशलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सायबर सुरक्षासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल अवीव विद्यापीठात सायबर वीक 2017 च्या परिषदेत नेतन्याहू बोलले की, 'आधी हे सांगण्यात नुकसान व्हायचं की मी इस्राईलमधून आहे. पण आता जेव्हा सायबर किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची चर्चा करतो तेव्हा हे सांगणे फायदेशीर ठरतं की आम्ही एक इस्राईलची कंपनी आहोत. संपूर्ण जगाला आपली गरज आहे. पूर्ण विश्व येथे येत आहे. 'मोदींना 'जगातील सर्वात महत्त्वाच्या पंतप्रधानांपैकी एक असल्याचं म्हणत नेतन्याहू यांनी म्हटलं की, भारतीय नेते सायबरसह अनेक क्षेत्रांमध्ये इस्त्राईलसोबत जवळचा संबंध बांधू इच्छितात.


इस्राईलने पीएम मोदीच्या दौऱ्याबाबत जारी केला व्हिडिओ


इजरायलच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या एका व्हिडिओनुसार नेतन्याहू यांनी येथे उपस्थित लोकांना हिब्रूमध्ये संबोधीत करतांना म्हटलं की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात महत्वाच्या पंतप्रधानांपैकी एक आहेत. भारत हा जगातील अत्यंत वेगाने वाढणारा तिसरा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे. ते पाणी, कृषी, आरोग्य आणि सायबर सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये इस्राईल सोबत जवळचे संबंध बांधू इच्छितात. आणि असं करण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठं कारण पण आहे. भारत आणि इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी चार जुलैला इस्राईलच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.


नेतन्याहू यांनी पुढे म्हटलं की, माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यामुळे जगात विशेषत: एक दिग्गज तंत्रज्ञानाचा देश म्हणून इस्राईलची वाढती स्वीकार्यता पूर्ण भावाने समोर येणार आहे.