`त्या` रहस्यमयी मेसजचा अर्थ कळाला; अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर 5 महिन्यांनतर संपर्कात
अंतराळात गायब झालेला 46 वर्ष जुना Spacecraft अखेर संपर्कात आला आहे. हा स्पेसक्राफ्टशी संपर्क साधण्यात नासाच्या संशोधकांना यश आले आहे.
Voyager 1 News: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाचा व्हॉयेजर- 1 हा 46 वर्ष जुना Spacecraft संपर्काबाहेर गेला होता. पाच महिन्यांपासून या Spacecraft शी कोणातही संपर्क होत नव्हता. अखेर पाच महिन्यानंतर या अंतराळात गायब झालेल्या स्पेसक्राफ्टशी संपर्क झाला. Spacecraft ने रहस्यमयी मसेज पाठवले होते. मात्र, या मसेजचा अर्थ कळत नव्हता. अखरे हा रस्हमयी मेसेज डिकोड करण्यात संशोधकांना यश आले आहे.
यापूर्वी देखील अमेरिकन स्पेस एजन्सी व्हॉयेजर- 1 Spacecraft हा पृथ्वीपासून 19 अब्ज KM अंतरावर असताना संपर्काबाहेर गेला होता. अचानक Spacecraft नासाच्या रडावरुन गायब झाला होता. अंतराळातून या Spacecraft चे आवाज येत होते. या आवाजाच्या दिशेनं NASA याचा शोध घेत होते. आहे. या Spacecraft मार्फत मेसेज रहस्यमयी मेसेज पाठवले जात होते. तसेच Spacecraft मधून आवाज देखील येत होते. हा Spacecraft एलियन्सना सापडले असून हे आवाज एलियन्सकडून मिळणारे संदेश असल्याचा दावा केला जात. मात्र, अखेर या मेसेजचा उलगडा झाला आहे.
अंतराळात भ्रमण करत असलेले व्हॉयेजर-1 Spacecraft हे नासाचे वैज्ञानिक मागील 46 वर्षांपासून पृथ्वीवरु ऑपरेट करत आहेत. नासाच्या वेबसाइटनुसार व्हॉयेजर- 1 हा Spacecraft पृथ्वीपासून 24 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. हा Spacecraft हळूहळू सौरमालेपासून दूर जात आहे. हे अंतर प्रकाशाच्या वेगाने पार करण्यासाठी रेडिओ सिग्नल मिळण्यासाठी 22.5 तास लागतात. याचा अर्थ Voyager 1 वर कमांड पाठवण्यास आणि प्रतिसाद प्राप्त करण्यास सुमारे दोन दिवस लागतात. व्हॉयेजर 1 ताशी 61,100 किलोमीटर वेगाने अंतराळात भ्रमण करत आहे. या Spacecraft ची लोकेशन सातत्याने बदलत आहे.
व्हॉयेजर- 1 ने पाठवलेल्या मेसेज डिकोड करण्यात यश
नोव्हेंबर महिन्यात व्हॉयेजर- 1 ने विचित्र मेसेज पाठवले होते. 14 नोव्हेंबररोजी शेवटचा मेसेज आला होता. व्हॉयेजर- 1 च्या ऑनबोर्ड संगणक प्रणालींपैकी एकामध्ये बिघाड आढळून आला. हे संगणक व्हॉयेजर्स फ्लाइट डेटा सबसिस्टम (FDS) चा भाग आहेत. दक्षिण कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील टीमला यात त्रुटी आढळल्या. डेटा गोळा करणारी मेमरी चिप करप्ट झाली. या चिपमध्ये एफडीएस संगणकाचा सॉफ्टवेअर कोडही होता. अखेर अभियंत्यांच्या टीमने कोडला अनेक भागांमध्ये विभागले आणि फ्लाइट डेटा सबसिस्टममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. 18 एप्रिल रोजी, व्हॉयेजर 1 ने पृथ्वीवर रेडिओ सिग्नल पाठवला. 20 एप्रिल रोजी नासाच्या ग्राउंड टीमला हा नवा मेसेज मिळाला.
तब्बल 46 वर्षांपासून हे Spacecraft कार्यरत
1977 मध्ये नासाने व्हॉयेजर-1 प्रक्षेपित केले होते. तब्बल 46 वर्षांपासून हे Spacecraft कार्यरत आहे. व्हॉयेजर- 1 त्याच्या प्रक्षेपणानंतर अवघ्या दोन वर्षांत ते गुरू ग्रहाच्या कक्षेत पोहचले. त्यानंतर 1981 मध्ये शनि, 1986 मध्ये युरेनस आणि 1989 मध्ये नेपच्यून ग्रहाचे या Spacecraft परिक्षण केले. सूर्यमाला पार करुन हे खोल व्हॉयेजर-2 Spacecraft अंतराळात पोहोचले आहे. व्हॉयेजर-2 Spacecraft विविध ग्रहांचा अभ्यास करत आहे. यापूर्वी देखील व्हॉयेजर-2 Spacecraft नासाच्या रडारवरुन गायब झाले होते. मात्र, पुन्हा ते NASA च्या संपर्कात आले होते.