चित्रपटगृहासोबतचं 4 स्विमिंगपूल असलेलं जगातील सर्वात महागडं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क
जगातील सर्वात महागडं घर आणि हॉलिवूड सेलिब्रिटींशेजारी राहण्याची सुवर्ण संधी
अमेरिका : प्रत्येकाला स्वतःचं घर असावं असं स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येक जण धडपड करत असतो. घरात महत्त्वाच्या सुविधा असाव्यात अशी इच्छा सगळ्यांच्याचं मनात असते. पण अमेरिकेत एक असं भव्य घर आहे, ज्यामध्ये सर्व लग्झरी सुविधा आहेत. या घरासमोर मोठ्या हवेल्याही फेल ठरल्या आहेत. जगातील सर्वात महाग आणि आलिशान घराचा पुढील काही दिवसात लिलाव होणार आहे.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाच्या नयनरम्य डोंगराळ भागात बांधलेल्या या घराचे नाव 'द वन' आहे. हे घर सुमारे 10 हजार चौरस फूट जागेत पसरलं आहे. घरात 21 बेडरूम, 4 स्विमिंग पूल, 45 सीटर सिनेमा हॉल, 30 कार पार्किंग गॅरेज, चालण्यासाठी रनिंग ट्रॅक, इनडोअर स्पा, ब्युटी सलून आहे.
घराच्या चारही बाजूंनी आपण शहरातील देखाव्यांचा अनुभव घेवू शकतो. या घराच्या शेजारी हॉलिवूड स्टार जेनिफर अॅनिस्टन आणि टेस्ला बॉस एलोन मस्क देखील राहतात. जर तुम्हाला हे आलिशान घर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला तब्बल 500 मिलियन डॉलर म्हणजेच 37 ट्रिलियन 93 कोटी 7 लाख रुपये मोजावे लागतील.
घराच्या मालकाने बोलीसाठी ही प्रारंभिक किंमत निश्चित केली आहे. घराच्या मालकावर165 मिलियन डॉलरचे कर्ज आहे. त्यामुळे भव्य घर विकण्याचा निर्णय घर मालकाने घेतला आहे. अमेरिकेतील सर्वात महागड्या घराच्या विक्रीचे रेकॉर्ड तपासले गेले तर हे घर अब्जाधीश केन ग्रिफिन यांच्या नावावर आहे.