मुंबई : आपला जिथे जन्म झाला, जिथे आपण लहानाचे मोठे झालो शिवाय जिथे अभिमानाने राहतो त्या ठिकाणाचं नाव आपण नेहमी घेतो. मात्र एक अशी जागा आहे जिथे लोकांना आपल्या गावाचं नाव सांगायलाही लाज वाटते. स्वीडनमधील एका गावात राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या गावाचं नाव अडचणीचं ठरलंय. आपल्या गावाचं नाव सांगण्यास ते कचरतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेन्सॉरशिपमुळे सोशल मीडियावर इथले रहिवासी आपल्या गावाचं नावही लिहू शकत नाही. आता ग्रामस्थांनी आपल्या गावाचं नाव बदलण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.


तसे या गावाचे नाव सांगताच गावकऱ्यांची मान शरमेने झुकते. या नावाला सारा इतिहास जोडला गेला असला आणि त्यावेळी कदाचित हे नाव लाजिरवाणं मानलं गेलं नसतं, पण आता हे नाव गावकऱ्यांना आवडत नाही. 


डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, स्वीडनमधील या गावाचे नाव 'Fucke' आहे. आता गावकऱ्यांनी त्याचं नाव बदलण्याची मोहीम सुरू केलीये. या गावाचे नाव ऐतिहासिक असून 1547 मध्ये हे नाव देण्यात आलं होतं.


ऐतिहासिक आणि जुन्या नावामुळे स्वीडनच्या नॅशनल लँड सर्व्हे डिपार्टमेंटलाही ते बदलण्यात अडचणी येतायत. मात्र, गावाचे नाव बदलून दुसरं काहीतरी करावं, अशी मागणी आम्ही यापुढेही लावून धरणार असल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं आहे. इथे एकूण 11 घरे असून त्यांच्या गावाचं नाव सांगायला लाज वाटते, असं या लोकांचं म्हणणं आहे.


सोशल मीडियावर लिहू शकत नाही


एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना एका गावकऱ्याने सांगितलं की, त्यांचं गाव शांत आहे आणि तिथले लोक आनंदी आहेत. तरीही त्यांना या गावाचं नाव बदलायचं आहे. याचे कारण सोशल मीडिया सेन्सॉरशिप आहे. यामुळे आक्षेपार्ह किंवा अश्लील वाटणारी नावं काढून टाकली जातात.