मुंबई : आज 31 डिसेंबर म्हणजे 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस. नवीन वर्षाचं आगमन करण्यासाठी अगदी काही अवधी उरला आहे. फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जग 2022 या नव्या वर्षाचं स्वागत करणार आहे. मात्र प्रत्येकाच्या स्वागताची पद्धत ही मात्र वेगळी असणार आहे. चला तर जाणून घेऊया न्यू ईयर साजरा करण्याची इतर देशांची काय पद्धत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझीलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अनोखी परंपरा आहे. या दिवशी लोकं खाण्यावर अधिक भर देतात. या ठिकाणी असं मानलं जातं की, डाळ खाल्ल्याने घरात समृद्धी येते.


जपानमध्येही नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अनोखी पद्धत आहे. यामध्ये New Year Eveला घंटी वाजवण्यात येते. यामध्ये लोकं दिवसातून 108 वेळा घंटी वाजवतात. घंटी वाजवण्याला या ठिकाणी शुभ मानलं जातं.


आफ्रिके नवीन वर्षाला आगळीवेगळी परंपरा मानली जाते. आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये लोकं त्यांच्यासाठी आवश्यक नसलेल्या गोष्टी फेकून देऊन नवीन वर्ष घरी साजरं करतात. या दिवशी लोक त्यांचं जुने फर्निचरसारख्या वस्तू फेकून देतात. यामुळे त्यांचं येणारं वर्ष चांगलं जाईल असा लोकांचा विश्वास आहे.


स्पेनमधील लोकं जसे घड्याळात 12 वाजतात तसे प्रत्येक तासाला 12 द्राक्षे खाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. येणारे 12 महिने भाग्याचे असतील असा यामगे त्यांचा विश्वास आहे.