तेहराण : इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९८० नंतर प्रथमच मोठा भूकंप झालाय. या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात. इराणच्या स्थानीक वेळेनुसार रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी ७.३ रिस्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. इराण-इराक सीमेवर रविवारी रात्री झालेल्या भूकंपातील मृतांची संख्‍या ४५० वर पोहोचली आहे. तर सात हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. येथे अद्‍यापही बचाव कार्य सुरु असून मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे.


केरमनशाह प्रांतातील सरपोल ए जहाब येथे झाला. हा परिसर हा इराण आणि इराक यांना विभाजित करणाऱ्या जगरोस पर्वतीय भागात झाला. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्यात. या भूकंपाचा फटका वीज आणि पाणीपुरवठ्याला बसलाय. 


अनेक ठिकाणीच बत्ती गुल झालेय तर पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. तसेच दूरसंचार सेवा कोलमलडी आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेत. दोन्ही देशांतील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून मृतांमध्ये प्रामुख्याने डोंगराळ भागात असलेल्या  गावातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.  भूकंपामुळे अनेक ठिकाणी जमीन खचली असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.