नवी दिल्ली : डोकलामच्या मुद्यावरुन भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आता अमेरिकेने समन्वयाची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांशी थेट संवाद साधून हा तणाव दूर करावा असं आवाहन पेंटागॉननं केलं आहे.


भारत आणि चीनने तणाव निवळण्याच्या दृष्टीने थेट संवाद साधावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते गॅरी रॉस यांनी म्हटलं आहे. भूतानचा भूभाग असलेल्या डोकलाममध्ये गेल्या महिन्यात चीनी लष्कराने घुसखोरी करून भारतीय लष्कराचे खंदक उद्धवस्त केले. डोकलाम हा चीनचा भाग आहे आणि तिथे भारतीय लष्कराने घुसखोरी केल्याचा आरोप चीननं केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी चीन पुरावे देखील सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. या भूभागातून भारत माघार घेत नाही तो पर्यंत भारताशी संवाद साधायचा नाही अशी चीनची भूमिका आहे.