Death mystery: मृत्यू होण्याच्या दोन आठवडे आधी शरीर देतं हे संकेत! जाणून घ्या
जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागतं. हे या जगातील अंतिम सत्य आहे.
Mystery of death: जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागतं. हे या जगातील अंतिम सत्य आहे. मृत्यू कोणीही टाळू शकत नाही. पण मृत्यूपूर्वी शरीर काही संकेत देतं का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला अस्वस्थ करतं. परंतु शास्त्रज्ञांनी याबाबत काही संशोधन केले आहे. मृत्यू येण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं, असं नमूद करण्यात आलं आहे . मात्र अपघाती मृत्यूबाबत सांगणं कठीण आहे.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, पॅलिएटिव्ह केअर डॉक्टर शेकडो लोक मरताना बघतात. त्यापैकी एका डॉक्टरने मृत्यूपूर्वी माणसाला कसे वाटते? याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याच्या शरीराची प्रतिक्रिया कशी होते आणि त्याच्या मनात काय सुरु असते. हृदयाची धडधड थांबण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी मृत्यूची प्रक्रिया सुरू होते आणि मग तो दिवस येतो जेव्हा एखादी व्यक्ती जगाचा निरोप घेते. लिव्हरपूल विद्यापीठातील संशोधक सीमस कोयल यांनी एका लेखात मृत्यूच्या प्रक्रियेबद्दल सांगितले आहे. दोन आठवड्यांपूर्वी लोकांची तब्येत बिघडू लागते. यासोबतच सर्वसाधारणपणे चालणे आणि झोप यातही अडचणी येऊ लागतात. व्यक्ती झोपते तेव्हा अनेकदा धक्क्याने जागा होतो. आयुष्याच्या शेवटच्या दिवसात गोळ्या, अन्न घेणे किंवा काहीही पिणे कठीण होते. अनेक लोक या संपूर्ण प्रक्रियेतून एका दिवसात जाऊ शकतात. काही जण प्रत्यक्षात मृत्यूपूर्वी एक आठवडा मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून येते, जे सहसा कुटुंबांसाठी खूप वेदनादायक असते. मृत्यूपूर्वी वेगवेगळ्या लोकांसोबत विविध गोष्टी चालू असतात आणि अशा परिस्थितीत त्यांचा अचूक अंदाज बांधणे फार कठीण असते.
मृत्यूच्या वेळी शरीराचे नेमके काय होते हा मुख्यतः न सुटलेला प्रश्न आहे. परंतु काही अभ्यासांनी असे सूचित केले आहे की, मृत्यूपूर्वी मेंदूमधून रसायने बाहेर पडू लागतात. यामध्ये एंडोर्फिनचा समावेश होतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये आनंदाची भावना वाढू शकते. सीमस म्हणाले की, मृत्यूचा खरा क्षण समजणे कठीण आहे. लोक मृत्यूच्या जवळ येत असताना, शरीराच्या तणावामुळे शरीरात रासायनिक प्रतिक्रिया वाढते. मृत्यूच्या प्रक्रियेदरम्यान लोकांच्या वेदना कमी होतात, परंतु त्यामागील कारण स्पष्ट नाही.