जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडले; इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा असा उभारला
इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. याचे गूढ उकलण्यात संशोधकांना यश आले आहे.
Sphinx Of Giza Mystery : जगातील सर्वात मोठे रहस्य उलगण्यात संशोधकांना यश आले आहे. इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा नेमका कसा उभारला गेला याचे गुढ अखेर उलगडले आहे. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याचा उलगडा केला आहे. खडकाच्या रचनेच्या विरुद्ध वारा कसा चालतो या प्रयोगाच्या मदतीने हे रहस्य उलगडण्यात आले आहे.
इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स जगातील सर्वात मोठे रहस्य
सिंहाचं शिर आणि माणासाचं धड असलेला इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. इजिप्तमधील नाईल नदीच्या गिझा पठारावर हा पुतळा उभा आहे. 73 मीटर लांबीचा हा पुतळा 19 मीटर रुंद आहे. तर, त्याची उंची 20 मीटर आहे. जगातला हा पुरातन पुतळा समजला जातो. इसवीसनपूर्व 2258 ते 2532 दरम्यानच्या काळात हा पुतळा उभारण्यात आल्याचा अंदाज आहे.
प्राचीन इजिप्तमधील अनेक प्राचीन वास्तू या शतकानुशतके लोकांसाठी एक रहस्य बनून राहिली आहेत. यात गिझाच्या ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा पिरॅमिडचाही समावेश आहे. हा पिरॅमिड कसा बांधला गेला? एवढे मोठे आणि जड दगड एका यंत्राशिवाय एकमेकांच्या वर कसे ठेवले गेले याचे गुढ शोधण्याचा संशोधक प्रयत्न करत होते. इजिप्तच्या प्राचीन स्फिंक्स पुतळ्याचे गूढ आतापर्यंत शास्त्रज्ञांना उकलण्यात यश आले नव्हते, परंतु आता शास्त्रज्ञांनी याच्या बांधकामाचे गूढ उकलले आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांना इजिप्तमधील ग्रेट स्फिंक्स 4,500 वर्षांपूर्वी कसा बांधला गेला हे शोधून काढले आहे.
या पिरॅमिडचे वैशिष्ट्य म्हणजे सिंहाचं शिर आणि माणासाचं धड अशी याची रचना आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याचे रहस्य उलगडले आहे. फिजिकल रिव्ह्यू फ्लुइड्स जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
संशोधकांचा प्रयोग यशस्वी
या पुतळ्याचे रहस्य उगडण्यासठी संशोधकांनी केलेला महत्वपूर्ण प्रयोग अखेर यशस्वी झाला आहे. स्फिंक्सच्या पुतळ्याच्या बांधकामाचे रहस्य सोडवण्यासाठी ईशान्य इजिप्तमध्ये प्रयोग करण्यात आला. 1981 मध्ये भूवैज्ञानिक फारूक एल-बाज यांनी स्फिंक्सच्या पुतळ्याबाबत असाच एक सिद्धांत मांडला होता. ग्रेट स्फिंक्सचे शरीर वाऱ्याद्वारे वाळूच्या धूपाने नैसर्गिकरित्या तयार झाल्याचा त्यांचा सिद्धांत होता. स्फिंक्सच्या पुतळ्याचे नाक तुटलेले आहे. कोणीतरी जाणूनबुजून हे कृत्य केले असावे असा समज आहे. बारकाईने पाहिले असता नाक फोडण्यासाठी छिन्नीचा वापर केल्याचे दिसून येते. शेकडो वर्षांपासून नाक गायब आहे. ग्रेट स्फिंक्सच्या हरवलेल्या नाकाचा सर्वात जुना उल्लेख 15 व्या शतकातील इतिहासकार अल-माक्रीझीच्या लेखनात आढळतो.