`या` तरुणीला आराम आणि फिरण्याचे वर्षाला मिळतात 3 कोटी रुपये! कारण जाणून तुम्ही पण व्हाल आश्चर्यचकित
Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची खूप चर्चा होते आहे. ती काही करत नाही तरीदेखील वर्षाला 3 कोटींचं पॅकेज आहे. नोकरी करत नाही, काम करत नाही मग तिला एवढे पैसे का मिळतात?
Trending Viral News : ही इथे प्रत्येक जण पोटासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबासाठी कुठलं ना कुठलं काम करतो. त्या कामाचे त्याला मोबदला म्हणून पैसे मिळतात. कामाच्या स्वरुपावरुन पैसे ठरवले जातात. चांगल्या पॅकेजसाठी जगभरात लोकांना चांगली नोकरी हवी असेल तर कठोर मेहनत करुन अभ्यास करुन पदवी मिळवावी लागते. तेव्हा जाऊन त्यांना चांगला पगाराची नोकरी मिळत असते. आज पुरुष असो किंवा महिला दोघीही समानतेने काम करत आहेत. चांगल्या कंपनीत नोकरी करत आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण ती कुठलही काम न करता वर्षाला 3 कोटी रुपये कमवते. नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊयात. (This Girl gets 3 crore rupees a year for comfort and travel You will also be surprised to know the reason)
असं काय करते 'ही' तरुणी?
न्यूयॉर्कमधील येलेना लाला नावाची मुलगी खूप शिकलेली आहे पण ती कोणतीही काम करत नाही. येलेना सांगते की, तिचा बॉयफ्रेंड तुला कुठलेही काम करु देत नाहीत. येलेनाने हे सांगताना तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नाही. पण तिचा हा बॉयफ्रेंड तिचा सर्व खर्च उचलतो. ती कितीही खर्च करु दे तरी तो तिचे पैसे भरतो. तिचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं नातं 2020 पासून सुरु आहे. तेव्हा पाहून ते दोघे सोबत आहेत. तिच्या बॉयफ्रेंडला टेक इंडस्ट्रीशी निगडीत कामात रस आहे. त्यामुळे त्याला जगभरात खूप फिरावं लागतं.
55 वेगवेगळ्या देशांमध्ये केला प्रवास
येलेना लाला आणि तिच्या प्रियकराने आतापर्यंत एकूण 55 देशांची भ्रमंती केली आहे. या सर्व 55 देशांची भ्रमंतीचा खर्च तिच्या बॉयफ्रेंडने उचलला आहे. न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना येलेनाने हे सांगितलं की, अलीकडेच तिचा प्रियकर तिला खासगी जेटमधून खास भेटायला आला होता. येलेना सांगते की, ती प्रवासाशिवाय कोणतेही काम करत नाही, एवढंच नाही तर जेव्हा ती थकते तेव्हा फक्त झोपण्याचं काम करते. ती म्हणते की तिचं एकमेव काम आहे तिच्या प्रियकरावर प्रेम करायचं अन् तिच्या खूप काळजी घ्यायची. तिला आयुष्यात खूष ठेवण्यासाठी आणि तिचा खर्च उचलण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड काम करतो.