लंडन : एका व्यक्तीचा असा दावा आहे की, तो 129 मुलांचा जैविक पिता आहे. त्याने त्याचा स्पर्म डोनेट करुन हे सगळं घडवून आणलं आहे. त्याला यावर्षी आणखी 9 मुले होणार असल्याचे सांगितले आहे. क्लाइव्हज जोन्स असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचे वय 66 वर्ष आहे आहे वयाच्या 58  वर्षापासून तो स्पर्म डोनेट करत आहे. क्लाइव्हज जोन्स एक शिक्षक आहे. तो यूकेमधील डर्बी येथील चॅडस्डेन येथे राहतो. क्लाइव्हज जोन्स हा मोफत स्पर्म दान करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेलीमेलमधील वृत्तानुसार, जोन्सला असे केल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. कारण लायसन्स क्लिनिकमध्ये जाऊन त्याने हे केलेलं नाही. क्लाइव्ह जोन्स सांगतो की, त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून स्पर्म डोनेशन केले. त्याच्या असं करण्यामुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात आनंद परत आला आहे.


क्लाइव्हज जोन्सचा असा ही दावा आहे की, तो जगातील सर्वात जास्त मूल जन्माला घालणारी व्यक्ती असू शकते. पुढे तो हेही म्हणाला की, आणखी काही वर्ष तो हे करत राहिल.


क्लाइव्हज जोन्सने त्याच्या अनुभवाबद्दल सांगितले की, त्याला अनेक माता पित्या त्यांच्या मुलाचे फोटो पाठवतात. हे फोटो पाहून त्याला फार आनंद होतो. क्लाइव्हज जोन्स स्वतः जवळपास 20 मुलांना भेटला आहे. या सर्व मुलांचा जन्म डर्बी, बर्मिंगहॅम, स्टोक आणि नॉटिंगहॅम येथे झाला. एवढच काय तर अनेक अशा वृद्ध लोकांनी देखील त्याला फोन केला, ज्यामुळे त्यांना आजी-आजोबा होण्याचे भाग्य मिळालं आहे.


त्याच्याकडे फेसबुकवर अनेक लोकं संपर्क साधतात आणि त्याच्याकडे स्पर्मची मागणी करतात.


1978 मध्ये लग्न झाले


जोन्सचे लग्न 1978 मध्ये झाले होते. पण आता तो पत्नीपासून वेगळा राहतो. स्पर्म डोनर बनण्याच्या त्याच्या निर्णयावर त्याची पत्नी खूश नाही. याआधी, जोन्स 2018 साली चॅनल 4 वरील '4 मॅन 175 बेबीज' या डॉक्युमेंट्रीमध्ये तो दिसला होता.