मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या `मिशन रजनीगंज`च्या कथेची पुनरावृत्ती
Raniganj Accident : राणीगंज येथील कोळसा खाणी काही कामगारांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे यावेळी याची जोरात चर्चा आहे. मिशन राणीगंज हा अक्षय कुमारचा चित्रपटही यावरच आधारित आहे.
Raniganj Accident : बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन ठार तर डझनहून अधिक जण अडकल्याची माहिती समोरे येते आहे. येथील परिस्थिती पुन्हा एकदा इतिहासातील त्या घटनेची पुन्हा आपल्याला आठवण करून देते. सध्या यामुळे पुन्हा एकदा चर्चांनाही उधाण आलं आहे. कोळसा खाणीत काम करणं काही सोप्पं नाही. त्यातून अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते. परंतु सध्या आपण जे पाहत आहोत त्यामुळे पुन्हा एकदा ही भयकंर स्थिती उद्धभवली आहे.
राणीगंज येथील घटनांच्या दु:खद आठवणी असताना आता येथील खाण समुदायाला एक मोठा धक्का बसला आहे. ज्यात राणीगंज येथील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या ओपन कास्टच्या कोळसा खाणीत तीन कोळसा खाण कामगारांना अनपेक्षित परिस्थितीत आपला जीव गमवावा लागला आहे. यातून काम करणाऱ्यांना भेडसावणाऱ्या जोखमांवर विशेष प्रकाश टाकला. खाणी खाणकामांसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे दुर्दैवाने अशा अनेक शोकांतिकेने चिन्हांकित केलेले ठिकाण आहे ज्यात अनेक कुटुंबे ही उद्ध्वस्त झाली आहेत आणि इथला समाज हा शोकात आहे.
जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतील यासाठी येथे बचावकार्य सुरू आहे. प्रत्येकाच्या आपापल्या परीनं प्रार्थना करत आहेत. अधिकारी आणि बचाव कर्मचारी कोळसा खाणीत अडकलेल्यांना व तेथील खाण कामगारांच्या सुटकेसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. आणखी काही जण अडकल्याची भीती असल्याने बचावकार्य सुरूच राहणार आहे. अहवालानुसार, असे दिसते की खाण कामगार कोळसा खाणीच्या निरुपयोगी भागातून कोळसा काढत होते ज्यामुळे ही जीवघेणी दुर्घटना घडली. तज्ञ आणि सेफ्टी ऑपरेटर जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
योगायोगाने, नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार स्टारर ‘मिशन राणीगंज’ या अडकलेल्या खाण कामगारांच्या अशाच दु:खद घटनेवर आणि त्यांना वाचवण्याच्या बचाव मोहिमेवर प्रकाश टाकतो. खाण कामगारांना दैनंदिन जीवनात कोणकोणत्या अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागते याविषयीची ही कथा आहे. अक्षय कुमारने आपल्या मुलाखतींमध्ये खाण कामगारांना भेडसावणाऱ्या दयनीय परिस्थितीबद्दलही सांगितले. या चित्रपट काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे याची जोरात चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फार चांगली कामगिरी करतो आहे. त्यामुळे हा चित्रपट चांगला गाजतो आहे. याचा विषयही प्रेक्षकांना जास्त आवडला. यावेळी अक्षय कुमारनंही फार चांगलं काम केलं आहे. याची जोरात चर्चाही सुरू झाली आहे.