Cutest Video Viral : सुखद म्हणजे नक्की काय असतं...हे एका आईला विचारा...नऊ महिने ज्या चिमुकल्याला गर्भात वाढविल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा (Newborn Baby Viral Video) जो जगात येतो तेव्हा आईचा दुसरा जन्म असतो. नऊ महिने आणि जन्माचा वेळीची वेदना त्या इवल्याशा जीवाला पाहून क्षणात सर्व सर्व विसरायला (Video viral on Social media) होतं. फक्त डोळ्यात तरंगतात ते आनंदाचे अश्रू...आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख...ते इवलेशे हात, पाय नाजूक स्पर्श...मन कसं आनंदाने बहरुन जातं. बाळाच्या येण्याची चाहुल लागते त्या क्षणापासून आई आणि मुलाचं नातं खास होऊन जातं. ( heart touching video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळाची गर्भापासूनच पहिली ओळख म्हणजे त्याची आई, तिचा आवाज जण त्याचा श्वास...आईचंही जग त्याच्या अवती भवती फिरायला लागतं. सोशल मीडियावर एक सुंदर आणि हृदयाला भिडणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. नुकताच जन्मलेला बाळाची आईला पहिली वहिली मिठी नेटकऱ्यांचं मन जिंकतंय...



हा आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक होतं आहे. तो जन्मानंतरचा पहिला क्षण हा शब्दात सांगणं प्रत्येक आईला शक्य नसतो. त्यावेळी फक्त डोळे बोलत असतात...तो खूप भावनिक क्षण असतो...ज्या तान्हुल्याला नऊ महिने गर्भात मोठं केलं त्याला पहिल्यांदाच असं हातात घेताना मन भरून येतं. आई आणि बाळाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर आतापर्यंतचा सर्वात सुंदर व्हिडीओ आहे असं म्हटलं वावग ठरणार नाही. (Trending heart touching video Newborn Baby Holding Mothers Face emotional Video viral on Social media)


'जादू की झप्पी'


हा थक्कं करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांना वेड लावत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ऑपरेशन थिएटरमध्ये नुकताच जन्मलेल्या बाळाला आईच्या चेहऱ्याजवळ नेताच त्याच क्षणी तो तिला जादूची झप्पी मारतो. हा क्षण पाहून प्रत्येक क्षण भारावून जातात...


हृदयस्पर्शी व्हिडीओ


हा आई आणि मुलाचा हृदयस्पर्शी व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा  शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतं आहे.



अनेकजण हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत तर काहीजण हा व्हिडीओ एडिटेड केल्याचं म्हणतं आहेत. पण आई आणि बाळाचं बॉन्डिंग, खास कनेक्शन  दाखविणारा हा व्हिडीओ मात्र इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.