Airplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? `या` कारणाचा कधी विचारही केला नसेल...
Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.
Why Airplane Color is White : जेव्हाही तुम्ही विमानात बसता, आणि तेव्हा तुमची नजर आजोबाजोला फिरते तेव्हा तुमच्या मनात अनेकदा प्रश्न येत असेल की, प्रवासी विमाने नेहमी पांढऱ्या रंगाची का असतात? तुम्ही प्रवासी विमान कधीही इतर कोणत्याही रंगात पाहिले नसेल. मात्र आता बर्याच विमान कंपन्यांच्या विमानांचा रंग बदलू लागला असला तरी, बहुतेक विमाने (Why are most commercial planes white in colour) अजूनही पांढरेच रंगवले जातात. अखेर यामागचे कारण काय?
बहुतेक विमाने पांढरे असतात
जरी आता जगातील अनेक विमान कंपन्याही त्यांच्या विमानांचा रंग वेगवेगळ्या रंगाचे दिले असले तरी आजही बहुतेक विमाने पांढर्या रंगाची आहेत. पूर्वीची विमाने रंगविरहित असायची. पण त्यामुळे ती लवकर घाण व्हायची आणि त्यांना गंजही यायचा. अशा स्थितीत त्यांना पांढरा रंग देण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. जरी याचे कारण केवळ चांगले दिसणे नसून काहीतरी वेगळे आहे.
…म्हणूनच विमाने पांढरी असतात
व्यावसायिक उड्डाणांसाठी वापरल्या जाणार्या विमानांचा रंग पांढरा असतो कारण, ते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर अधिक चमकदार दिसतातय. तर इतर रंग सूर्यप्रकाश शोषण्याचे काम करतात. चमकदार रंगांमुळे विमानाची बॉडी गरम होऊ शकते, तर पांढरा रंग उष्णतेपासून संरक्षण करतो. ज्यामुळे सौर किरणोत्सर्गामुळे होणारे नुकसान टाळता येते. ते कमी होण्याची शक्यता देखील कमी आहे. पांढऱ्या रंगामुळे पक्ष्यांनाही ते दुरून पाहता येते आणि अपघात टळतात.
वाचा : CBSE 10वी, 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
तसेच विमान कंपन्यांना असे वाटले की विमानाचा रंग जितका गडद असेल, तितके त्याचे वजन होईल. याशिवाय पांढरा रंग सूर्याच्या किरणांना योग्यरित्या परावर्तित करू शकतो. विमानाचे आयुष्य वाढवण्यासाठीही ते उपयुक्त ठरेल. जिथे बाकीचे रंग उडून जातात, तिथे पांढरा रंग हलका होत नाही.
... म्हणून सुरूवातीला मॅटेलचे विमान
सुरूवातीला पांढऱ्याऐवजी मॅटेलचे विमान निवडायचे. कारण जर विमानात काहीतरी तुटले किंवा क्रक झाले तर ते पेंट केलेल्या विमानावर सहज दिसत होते. पण जर मॅटेलच्या विमानात चढताना काही अडचण आली तर ते समजणे पण सोपे जात होते. या विमानांना काही काळानंतर विमान कंपन्यांनी सेवेतून बाहेर काढले जाते. त्यानंतर मॅटेलच्या विमानाची जागा पांढऱ्या रंगाच्या विमानाने घेतली.