Trending News : 'कोई मिल गया' या चित्रपटातील जादू आठवतो तुम्हाला...त्या जादूने पुन्हा जगाशी संपर्क केला आहे. हो हो, बरोबर वाचलं तुम्ही, या चित्रपटात ऋतिक रोशनच्या (Hrithik Roshan) वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना एका रेडिओद्वारे दुसऱ्या जगातून सिग्नल येतात. त्याच प्रकारचे सिग्नल आपल्या शास्त्रांना आले आहे. त्यामुळे एलियन इज बॅक असं म्हणायला हवं. 


 
एलियन इज बॅक!(Alien is back)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, शास्त्रज्ञांना (Scientists) सतत अंतराळाच्या (Space) एका कोपऱ्यातून सतत सिग्नल (signal) मिळत आहेत. हे सिग्नल 82 तासांत जवळपास 1863 वेळा आले आहेत. त्याशिवाय हे एक प्रकारचे नवीन रेडिओ सिग्नल (radio signal) असल्यामुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. हे सामान्य फास्ट रेडिओ बर्स्ट (FRB) पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ डोळ्या अंजन घालून या सिग्नलवर लक्ष ठेवून आहेत. (Trending News Alien contact with Earth and mysterious signals)



हे सिग्नल आकाशगंगेतून (galaxies) येतं असून या सिग्नलला शास्त्रज्ञांनी FRB 20201124A असं नाव देण्यात आलं आहे. हे चीनच्या फाइव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने (फास्ट) (fast radio burst) पकडले आहे. चीनमधील पेकिंग विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या सिग्नलचा अभ्यास करत आहेत. says astrophysicist Bing Zhang 



अमेरिका आणि चीनही टेन्शनमध्ये (America and China)


या सिग्नलनंतर अमेरिका आणि चीनची झोप उडवली आहे. आता या दोन्ही देशांमधील शास्त्रज्ञ या सिग्नलवर अभ्यास करणार आहेत. हे सिग्नल शास्त्राज्ञांपासून सगळ्यांच्या कल्पनापलिकडील रहस्यमयी आवाज (mysterious signals) आहेत. 



जवळपास 15 वर्षांपूर्वी लागलेल्या फास्ट रेडिओ बर्स्ट (FRB) चा शोधानंतर शास्त्रज्ञांना सतत हे सिग्नल मिळत आहेत. हे सिग्नल शास्त्राज्ञांनाही समजणे कठीण जातं आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी असे अनेक संकेत पकडले आहेत.


मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) (Massachusetts Institute of Technology) मधील शास्त्रज्ञांनी तीन सेकंदांसाठी सक्रिय असलेले सिग्नल देखील रेकॉर्ड केले आहेत. हा सिग्नल दर 0.2 सेकंदाला तीन सेकंदांसाठी येत आहे. विशेष म्हणजे हे सिग्नल वेळेवर मिळत असल्यामुळे असं वाटतं होतं की, जणू हे कोणतरी ठरवून करत आहेत. त्यामुळे एलियन हे जगाशी संपर्क आहेत असं शास्त्राज्ञांना वाटतं आहे. पण यावर अजून अधिकृत काही सांगण्यात आलेलं नाही.