Viral Video : तुम्ही कधी ऐकलं आहे का की, रोमान्स केल्यामुळे कोणाचा मृत्यू झाला. पण अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये रोमान्स दरम्यान गर्लफ्रेंडच्या एका कृत्यामुळे बॉयफ्रेंडचा काही वेळानंतर मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोमान्स करताना प्रियकर प्रेयसी अनेक प्रकारे या क्षणाचा आनंद घेतात. त्यातील एक प्रकार म्हणजे लव्ह बाइट...प्रियकर असो किंवा प्रेयसी अनेकांना लव्ह बाइट करायला आवडतं. हीदेखील प्रेम व्यक्ती करण्याची प्रेमाची भाषा असतं असं या कपलचं म्हणं असतं. पण हीच प्रेमाची भाषा एका तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरली आहे. (Trending News Boy Dies After Girlfriend Gives Him Love Bite  AI video viral )


मेक्सिकोमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. झालं असं की, ज्युलियो मॅकियास गोन्झालेझ नावाचा 17 वर्षांचा मुलगा सोशल मीडियावर टिकटॉकर आहे. तो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. इझतपलापामध्ये राहणारा ज्येलिओचा आर्टिफिशियल इंटेलिन्स अवताराचा एक व्हिडीओ इंटरनेटवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 


या व्हिडीओमध्ये त्याने आपला मृत्यू कसा झाला हे सांगितलं आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना...ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईच्या रिपोर्टनुसार, असं झालं की, ज्युलिओ त्याच्या 24 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत तो रोमान्स करत होता. त्यावेली तिने त्याचा गळ्यावर लव्ह बाइट दिला. प्रेमात असे लव्ह बाइट देणं काही नवीन नाही. त्यामुळे त्यानेही या गोष्टीकडे फारसं गार्भीयाने पाहिलं नाही. 


रोमान्स केल्यानंतरही दिवसभर ते दोघे आनंदात होते. त्यानंतर ते दोघे ज्युलिओच्या घरी पालकांसोबत जेवायला गेले. जेवत असताना अचानक ज्युलिओ बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. पालकासोबत त्याची गर्लफ्रेंडही घाबरली त्यांना काही कळलं नाही. जेवता जेवता क्षणात काय झालं ते. त्यांनी तात्काळ त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेलं.


मात्र त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की, त्याचा मृत्यू गर्लफ्रेंडने घेतलेल्या लव्ह बाइटमुळे झाला होता. 


 


हेसुद्धा वाचा - क्रूरतेचा कळस! पत्नीने पतीच्या केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, अन् मग दिव्यांग पतीसोबत तिने…


 


डॉक्टरांच्या म्हणानुसार ज्यावेळी त्याचा गर्लफ्रेंडने ज्युलिओच्या मानेवर लव्ह बाइट घेण्यासाठी चावा घेतला त्यामुळे तिच्या दातामुळे त्याच्या मानेवरील रक्तवाहिन्या फुटल्यात, त्यामुळे शरीरात रक्त गोठलं. 



ज्युलिओ शरीरात लव्ह बाइटमुळे इतक्या जास्त प्रमाणात गुठळ्या तयार झाल्या होत्या की, त्याचा मेंदूतही गुठळी निर्माण झाली होती. या गुठळींमुळे त्याचा मैंदूतील रक्त वाहिन्याही फुटल्या जात त्याचा मृत्यू झाला.  ही घटना 2016 मधील असली तरी या मृत मुलाच्या एआय अवताराचा व्हिडीओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल झाला आहे.