Trending Viral News : प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही रहस्य असतं. कधी कधी ते रहस्य त्यांचासोबतच निघून जातं. तर कधी अचानक ते जगासमोर येतं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं. त्या एका रहस्याचा परिणाम त्या व्यक्तीसोबतच इतरांच्या आयुष्यावरही होतो. अशी एक धक्कादायक घटना एका तरुणाच्या आयुष्यात घडली आहे.  त्याचा एक कृत्याने त्यांचं हसत खेळतं कुटुंब उद्धवस्त झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या 19 वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर त्याचा आयुष्यातील सर्वात धक्कादायक आणि आयुष्याला हादरुन सोडणाऱ्या घटनेविषयी सांगितलं आहे. त्याच्या आईच्या आयुष्यातील ते सत्य समोर आलं आणि क्षणात त्याचं छोटं विश्वात भूकंप आला. 


झालं असं की, त्या तरुणाला वाढदिवसाला गिफ्टमध्ये पैसे मिळाले होते. त्या पैशांतून त्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा या कल्पनेच वडिलांनीही साथ दिली. मग काय या दोघांनी डीएनए चाचणी करुन घेता. अन् मग काय त्यांचा आयुष्यात त्या एका डीएनए चाचणी उलटपुलट करुन टाकलं. 


धक्कादायक रहस्य समोर...


या एका डीएनए चाचणीमुळे आईने वर्षोंवर्षे लपवून ठेवलेलं सत्य त्या दोघांच्या समोर आलं आणि त्यांचा पायाखालची जमीन सरकते. जेव्हा या चाचणीचा निकाल येतो तेव्हा मुलाचा आणि वडिलांचं डीएनए फक्त 29.2 टक्के जुळतं. शिवाय या चाचणीच्या रिपोर्टमधील निकर्षामध्ये तो मुलगा आणि वडील सावत्र भाऊ असू शकतात. हा रिपोर्ट पाहून दोघांना धक्काच बसतो. 


त्या दोघांना वाटलं काही तरी चुकलं आहे, त्यामुळे हे कंफ्यूज निर्माण झालं आहे. दोघेही विचार करत होते की नेमकं काय झालं...तर त्या तरुणाने त्याचा चुलत बहिणीच्या डीएनए करण्याचं ठरवलं. तिनेही होकार दिला. तिचा डीएनए आणि त्या तरुणाचा डीएनए 24.6 टक्के जुळला. कारण चुलत भावंडांचे डीएनए हे फक्त 12 टक्के जुळतं असतात. या रिपोर्टनंतर त्यांच्या आयुष्यातील एक मोठं रहस्य समोर आलं होतं. (Trending News boy dna test reveal mother uncle extra marital affair mother cheating father viral news on Social media)


आईचं एवढं मोठं सत्य जगासमोर आलं...


या डीएनए चाचणीनंतर एक मोठं सत्य बाहेर येणार हे त्या तरुणाला कळलं होतं. त्याने आईला या बद्दल विचारलं आणि तिने जे काही सांगितलं त्यानंतर त्यांचं हसत खेळतं कुटुंब क्षणात उद्धवस्त झालं. त्याचा आईचं आणि काकाचं एकमेकांशी अनैतिक संबंध होती. तरुणाने वडिलांना या गोष्टीची कल्पना दिली आणि आई-वडिलांमध्ये भांडण झाली. वडिलांचं आणि काकांचंही बाचाबाची झाली. कारण तो तरुण त्याचा आई आणि काकांचा मुलगा होता.