अंडरगार्मेंटमुळे मुलगी गरोदर राहिली? महिलेच्या दाव्याने खळबळ... कंपनीला द्यावं लागलं स्पष्टीकरण
Trending News : एका महिलेने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. अंडरगार्मेंटमुळे आपली मुलगी गरोदर राहिली असल्याचा दावा या महिलेने केला आहे. या महिलेने मुलीसाठी ऑनलाईन अंडरगार्मेंट खरेदी केल्या होत्या. महिलेच्या आरोपानंतर कंपनीनेनेही उत्तर दिलं आहे.
Trending News : एका महिलेने केलेल्या विचित्र आणि हास्यास्पद दाव्याने सोशल मीडियावर या महिलेची चांगलीच चर्चा रंगली आहे. महिलेने केलेल्या दाव्यानुसार तीने आपल्या मुलीसाठी ऑनलाईन साईटवरुन अंडरगार्मेंट्स मागवले होते. पण हे अंडरगार्मेंट (Undergarment) वापरल्याने मुलगी गरोदर राहिली. महिलेने अंडरगार्मेंट बनवणाऱ्या कंपनीविरुद्ध दावा ठोकला असून कंपनीकडून स्पष्टीकरणही मागितलं आहे. या घटनेची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा रंगली आहे. चीनमधली ही घटना आहे.
ओडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार महिलेने चीनमधल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मवरच्या ताओबाओ कंपनीच्या अंडरगार्मेंट विकत घेतल्या. आपल्या मुलीसाठी तीने दोन जोडी अंडरगार्मेंट मागवल्या होत्या. पण या अंडरगार्मेंट वापरल्यामुळे मुलगी गरोदर राहिली असा आरोप महिलेने केला. मुलगी गरोदर असल्याचं समोर आल्यानंतर महिलेने थेट कंपनीविरोधात कोर्टात याचिका केली. तसंच कंपनीकडून स्पष्टीकरणही मागवलं.
आरोपावर कंपनीचं स्पष्टीकरण
कोर्टाने आदेश दिल्यानंतर कंपनीला अखेर स्पष्टीकरण द्यावं लागलं. कारखान्यात केवळ महिला काम करतात आणि कंपनीच्या मालकाने नसबंदी केली आहे, असं स्पष्टीकरण ताओबाओ कंपनीने दिलं आहे. त्यामुळे मुलगी गरोदर राहण्याच्या प्रकरणाशी कंपनीचा काहीही संबंध नसल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
महिला हे प्रकरण सार्वजनिक करेल अशी भितीही कंपनीला सतावतेय. त्यामुळे कंपनीने महिला आणि कस्टमर केअर दरम्यान झालेलं संभाषण सोशल मीडियावर सार्वजनिक केलं आहे. महिलेचा दावा किती हास्यास्पद आणि निरर्थक आहे, हे लोकांना कळावं या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचललं आहे.
कंपनीने हे प्रकरण सोशल मीडिआवर शेअर केल्यानंतर चांगलंच व्हायरल झालं आहे. या पोस्टवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची शक्यता काही युजर्सने व्यक्त केली आहे. तर अंडरगार्मेंटमुळे मुलगी गरोदर राहू शकते हा दावा केवळ प्रसिद्धीसाठी केला असावा असं काही युजर्सचं म्हणणं आहे.
महिला सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर
महिलेने निरर्थक दावा केल्यानंतर कंपनीने या प्रकरणाचा तपास केला. ही महिला सोशल मीजिया इन्फ्ल्युएंसर असल्याचं समोर आलं आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या महिलेने दावा केल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारच्या घटना देशासाठी धोकादायक असल्याचं कंपनीच्या सीईओने म्हटलं आहे. तसंच निरर्थक दावे आणि अफवा एका प्रसिद्ध उद्योगाला नुकसान पोहोचवू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.