Trending News : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या ग्राहकांना काहीवेळा काही विचित्र अनुभवाचा सामना करावा लागतो. हा अनुभव काही वेळा आनंदाचा असतो तर काही वेळा भयानकही ठरतो. पण एका जोडप्याला आतापर्यंत कोणाबरोबरच झालेला नसेल अशा विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं. एक तरुण आपल्या पत्नीसह हॉटेलमध्ये (Restaurant) जेवायला गेला होता. दोघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर त्यांनी वेटरकडे बिल (Bill) मागितलं. वेटर घेऊन आलेलं बिल पाहून या जोडप्याच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलले. या बिलावर चक्क शिवी छापण्यात आली होती. इतकंच नाही तर त्या शिवीचे (Offensive Language) पैसेही लावण्यात आले होते. शिवी पाहून हे जोडपं प्रचंड संतापतलं, त्यांनी या बिलाचा फोटो काढून सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतापलेल्या जोडप्याने याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडे जाब विचारला. यावर हॉटेच्या मॅनरेजरने दिलेलं उत्तर ऐकून जोडप्याचा राग कुठच्या कुठे पळून गेला आणि दोघंही हसू लागले. अमेरिकेतली ही घटना आहे. 


सोशल मीडियावर बिल व्हायरल
या व्यक्तीने सोशल मीडियावर बिल शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या व्यक्तीने बिल शेअर करत एक कॅप्शन लिहिला आहे, त्यात त्याने म्हटलंय माझ्या जेवणाच्या बिलात माझ्यासाठी एक शिवी छापण्यात आली आहे. आम्ही जेवणात एकूण सहा पदार्त मागवले होते, या पाच पदार्थांव्यतिरिक्त सहावा पदार्थ म्हणून 'You're an A**hole' ही शिवी छापण्यता आली आहे. विशेष म्हणजे या शिवीचे 15 डॉलर लावण्यात आले आहेत. असं या व्यक्तीने लिहिलं आहे.  सुरुवातीला हॉटेल आपल्यावर राग काढत असल्याचं वाटलं. पण याबाबत जेव्हा हॉटेल मॅनजेरला विचारण्यात आलं तेव्हा संपूर्ण प्रकरणावरचा पडदा उघडला. 


काय आहे प्रकरण?


या व्यक्तीने मॅनेरजला नेमकं काय प्रकरण आहे याबाबत विचारणा केली. यावर मॅनेजर सांगितलं हे एक ड्रिंकचं नाव आहे. जे ड्रिंक त्या जोडप्याने मागवलं होतं. ड्रिंकचं असं विचित्र नाव ऐकून जोडप्याला हसावं की रडावं हे कळत नव्हतं. पण त्यांच्या शंकेचं निरासण झालं. या जोडप्याने हे बिल रेडिट पोस्टवर शेअर केली. यावर 40 हजार अपवोट आले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 



एका युजरने म्हटलंय काश a*****s ही शिवी दिल्यावर पैसे मिळत असते, तर आम्ही खूप पैसे कमावले असते. तर एका युजरने म्हटलंय या ड्रिंकचं नाव खूपच विचित्र आहे. काहीही असो पण हे बिल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय हे नक्की.