Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी `हे` कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती
Viral News : बाहेर फिरायला जायचं म्हटलं की, तिकीटाचा खर्च मग राहण्याचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च म्हटलं की, आपण शंभर वेळा आपण विचार करतो. पण एक जोडप गेल्या 5 वर्षांपासून तिकीट, हॉटेलचा खर्च न करता जगभ्रमंती करत आहेत.
Couple Travelling World : दिवाळी सुट्टी असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी भारतातील भारत किंवा परदेशात फिरायला जाण्याचा विचारही आपण केला तरी, डोळ्यासमोर तिकीट, हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च येतो. परदेशातील एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, लाख रुपये कुठेही गेले नाहीत. पण एक कपल आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. हे कपल गेल्या पाच वर्षांपासून तिकीट आणि हॉटेलचा खर्च न करता जगभरात फिरतायेत. (Trending news foreign couple travel without spending money since 5 years viral news marathi today)
ही ट्रेंडिंग कहाणी आहे मार्को आणि फ्रॅन या जोडप्याची. या दोघांनाही भटकंतीची खूप आवड. मार्को शिकागोमध्ये असताना Accenture या ठिकाणी काम करत होता तर फ्रॅन अर्जेंटिनामध्ये इंटर्निंग करत होती. 2016 मध्ये एका ट्रिप दरम्यान या दोघांची भेट झाली. ते दोघे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप असताना डेटवर जाण्यासाठी हे कॅफे किंवा रेस्टारंटची निवड न करता चक्क हे दोघे एखाद्या देशात डेटवर जायचे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले ते डेटसाठी आतापर्यंत भारत, थायलंड, ब्राझील, अर्जेंटिना इत्यादी देशात गेले आहेत.
जग फिरायण्याची आवड हा दोघांमधील नात्याचा घट्ट दुवा होती. 2018 मध्ये दोघांनीही कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या आणि जगाच्या प्रवासाला निघाले. या दोघांना लाइफ कोचिंगचा व्यवसाय करायचा होता. पण हॉटेल किंवा प्लाइटवर खर्च करायचा नव्हता.
त्यासाठी त्यांनी भन्नाट जुगाड शोधून काढला, मार्को आणि फ्रॅनही यांनी दुसऱ्यांचं घरी राहून ते सांभळायचा निर्णय घेतला आणि त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत होते. यासाठी TrustedHousesitters.com वर त्यांनी प्रोफाइल तयार केली. या साइटवरुन त्यांना अलास्कामध्ये एक नोकरीची ऑफर आली. पहिल्या घरात त्यांना कुत्रा आणि कॉकॅटियल पक्ष्याची काळजी घ्यायची होती. एक कार, दोन बाइक, हायकिंग गियर सोडलं जेणे करुन त्यांना यांची काळजी घेण्यास सोप जावं.
पहिल्या घराचा अनुभव चांगला असल्याने दोघांनीही वेबसाईटवरून आणखी घरांचे बुकिंग सुरू केले. त्यांनी आतापर्यंत 25 घरं सांभाळली आहेत. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून या जोडप्याला तिकीट किंवा राहण्याचा कुठलाही खर्च न करता जगभ्रमंती करता येतं आहे.