Trending News: सोशल मीडियावर (Social Media) अनेक जण क्रिएटिव कंटेंट (Creative Content) शेअर करत असतात. पण काही जण आपलं वैयक्तिक आयुष्याचीही माहितीही सोशल मीडियावर जाहीर करतात. असंच एका तरुणाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो पाहून युजर्सची उत्सुकताही वाढली आहे. हा फोटो पाहून युजर्सने मुलीच्या क्रिएटिव्हीटिला आणि मुलाच्या बौद्धीक कौशल्याला दाद दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीने मोबाईल नंबर दिला पण...
हेनपेक्ड हेल नावाच्या ट्विटर अकाऊंटवर (Tweeter) काही फोटो शेअर करण्यात आले होते. एका मुलीबरोबर झालेल्या संभाषणाचा हा स्क्रीनशॉट (Screen Shot) आहे. या मुलाला एका कार्यक्रमात त्याची ड्रीम गर्ल (Dream Girl) भेटली. यावेळी त्या मुलाने तिचा मोबाईल नंबर मागितला. या मुलीचं नाव जॅकी असं आहे, जॅकीने हेनपेक्डला आपला मोबाईल नंबर दिलाही. पण यात एक ट्विस्ट होतं. त्या मुलीने आपला मोबाईल नंबर देताना त्यातील काही अंक गाळले. 


मुलाने असा शोधला नंबर
व्हायरल होणाऱ्या फोटोत मुलीने दिलेला तो अपूर्ण नंबर दिसतोय. आता तो नंबर पूर्ण करण्याचं आव्हान हेनपेक्डसमोर होतं. हेनपेक्डनेही ते आव्हान स्विकारत जॅकीचा नंबर शोधून दाखवला. हा जुगाड करताना त्याला बराच वेळ लागला पण शेवटी तो यशस्वी ठरला. त्याने सीरियलनुसार गाळलेल्या जागेत एक ते नऊ अंकापर्यंत सर्व क्रमांक टाकले आणि त्यांना कॉल केले. शेवटी जॅकीचा अचूक नंबर शोधण्यात हेनपेक्डला यश आलंच.


गर्लफ्रेंडचा मोबाईल नंबर मिळवण्यासाठी केलेला जुगाड हेनपेक्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या अनोख्या लव्हस्टोरीचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होत आहे.