आता ट्रॅफिकचं नो टेन्शन! किक मारताच थेट पोहोचाल तुमच्या Destination ला
भारतात गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिकचे (Traffic) टेन्शन वाढलं आहे. मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशात आता तुमचं ट्रॅफिकचं टेन्शन संपणार आहे.
Flying Bike: बॉलिवूड (Bollywood) असो व्वा हॉलिवूड (Hollywood) यातून आपण उडणारी कार (flying car), बाईक (Bike) आणि माणसं (flying people) पाहिली आहे. यासगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा (Technology) वापर केला जातो. पण आज ज्या गतीने आपण प्रगती करतो आहोत तंत्रज्ञान खूप जास्त पुढे गेलं आहे. आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. आता इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्याच्या कटकटतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कारण रस्ताच करणार आहे वाहन चार्ज...
भारतात गेल्या काही वर्षांपासून ट्रॅफिकचे (Traffic) टेन्शन वाढलं आहे. मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवर तासंतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अशात आता तुमचं ट्रॅफिकचं टेन्शन संपणार आहे. तुमच्या गाडीला एक किक मारा आणि थेट पोहचा तुमच्या Destination वर
मग आता तुम्ही विचार कराल कसं शक्य आहे हे, उडणारी कारही आपण पाहिली आहे. मग बाईक नाही का उडू शकतं...तर थांबा बाईकप्रेमींसाठी (bike lovers) आनंदाची बातमी (good news) आहे. जगातील पहिली उडणारी बाईक (Worlds first flying bike) लाँच झाली आहे. हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. (Trending News good news for bike lovers flying bike Video nm)
हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल. आता आकाशात तु्म्ही भ्रूम..भ्रूम करत बाईक चालवू शकता, नाही नाही उडवू शकता...
AERWINS Technologies या जपानी स्टार्टअप कंपनीनं ही बाईक बनवली आहे. Xturismo असं या बाईकचं नाव आहे. या बाईकचं वजन 300 किलो असून ही बाईक ताशी 100 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकते. तर डेट्रॉईट ऑटो शोचे सह-अध्यक्ष थाड स्झोट (Thad Szot) यांनी स्वतः या बाईकची टेस्ट केली. ते म्हणाले की, हे खूप उत्साहवर्धक आणि आश्चर्यकारक आहे.
तुमच्या आमच्या स्वप्नातील या बाईकसाठी आपल्याला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. या बाईकची किंमत आहे 7 लाख 77 हजार डॉलर्स...म्हणजे 6 कोटी 18 लाख...अरे देवा एवढी महाग...चला काही असो पण जगातील पहिली उडणारी बाईक आली आहे.