दानपेटीत सापडलेली वस्तू पाहून संचालकांना फुटला घाम, अखेर पोलिसांनाच बोलवावे लागले
Human Skull Found In Donation Box: दानपेटीत नेहमीच चांगल्या गोष्टी दान केल्या जातात. मात्र, अमेरिकेतील एका दानपेटीत असं काही सापडलं की सगळेच हादरले आहेत.
Trending News In Marathi: मंदिरात किंवा एखाद्या सार्वजनिक मंडळामध्ये दानपेटीची रचना केलेली असतात. यात अनेक देवाच्या चरणी पैसे अर्पण करत असतात. त्यानंतर हे पैसे गरिबांसाठी खर्च करता येतात किंवा मंदिराच्या कामासाठी वापरले जातात. भारतात जशा दानपेट्या असतात तशा जगभरात गुडविल स्टोअर असतात. येथे गरिबांसाठी काही गोष्टी दान केल्या जातात. पैशांसह गरजेचे सामानही यात दान केले जाते. त्यानंतर हे सामान कमी पैशात किंवा मोफत लोकांना दिले जाते. मात्र, अमेरिकेतील गुड विल स्टोअरमध्ये एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे.
दानपेटी उघडताच बसला धक्का
दानपेटीतील वस्तूंचा वापर चांगल्या कामासाठी केला जातो. कारण लोकांनी सढळ हाताने गरिबांसाठी किंवा देवासाठी या वस्तू दान केल्या जातात. मात्र अमेरिकेतील एका गुडविल स्टोरमधील दान पेटी उघडल्यानंतर आतील वस्तू पाहून संचालकांच्या अंगाचा थरकापच उडाला. त्यानंतर लगेचच पोलिसांना फोन करण्यात आला. दानपेटीमध्ये अशी भयंकर वस्तू सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोणीतरी खोडसाळपणा करत दानपेटीत मानवी कवटी टाकली होती.
5 सप्टेंबर रोजी एका गुडविल स्टोअरमध्ये ही कवटी मिळाली आहे. कवटी मिळाल्याची सूचना मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी ती ताब्यात घेतली आहे. दानपेटीत टाकलेली कवटी तिथे कशी आली. कोणता गुन्हा तर नाहीना घडला अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कवटी अन्य टॅक्सिडर्मिड वस्तुंच्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आली होती. या मानवी कवटीची ओळख अद्याप पटवण्यात आली नाहीये.
गुडइयर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पोस्ट केलेल्या फोटोनुसार, सफेद रंगाची असून पूर्णपणे सडली आहे. तर डाव्या बाजूला खोटा डोळाही चिटकवण्यात आला आहे. तर, कवटीवर काही दातही दिसत आहेत. कवटीचा हा फोटो खूपच भयानक आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खूपच भयानक आहे, आम्ही इथे नेहमी येतो याआधी कधीच असं घडलं नाही. हा मूर्खपणा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकिय चाचणी केल्यानंतरही हाती काहीच लागलं नाहीये. ही मानवी कवटी खूपच जूनी आहे, त्यामुळं फॉरेंसिक तपासणीतही काहीच समोर आले नाहीये. नक्की ही कवटी तिथे आली कुठून व कोणाची आहे, अशा अनेक प्रश्ने अनुत्तरीत आहेत.