बीळ समजून कानात घुसला साप..कधीच पहिला नसेल असा video..येईल अंगावर काटा
हा व्हिडीओ पाहताना अंगावर शिसारी येते कारण बराच प्रयत्न करुनसुद्धा हा साप(snake)बाहेर निघत नाहीये
Trending video on social media of snake in woman ear :सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ(VIDEO) तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.हा व्हिडीओ कुठला आहे आणि व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते नेमकं कसं घडू शकतं यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये मात्र इंटरनेटवर हि व्हिडीओ क्लिप अगदी वाऱ्यासारखी पसरलीय आणि पाहणाऱ्यांना धक्काच बसलाय .
माणसाच्या कानात साप सापडणं ही काही सामान्य गोष्ट नाही. या व्हायरल क्लिपमध्ये(VIRAL VIDEO ) एक 'डॉक्टर' महिलेच्या कानातून साप काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सुरवातीला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओमध्ये एका महिलेच्या कानातून चक्क साप काढण्याचा प्रयत्न केला जात आहे,साप महिलेच्या कानात शिरलाय आणि डॉक्टरांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचं काम सुरु असल्याचं दिसत आहे .
एकूणच हा व्हिडीओ पाहताना अंगावर शिसारी येते कारण बराच प्रयत्न करुनसुद्धा हा साप(snake)बाहेर निघत नाहीये इतकंच काय तर तोंडाजवळ हाथ लागताच हा साप चावण्यासाठी हिंसक झाला , हे पाहून धक्काच बसला.
3.49 मिनिटांचा हा व्हिडीओ पाहताना त्या महिलेची अवस्था बघवत नाहीये तिला जो त्रास होत आहे तो या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे.
नोट: संबंधित व्हिडीओ तुम्हाला विचलित करु शकतो.