USA White House: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊसजवळ वीज पडल्यामुळे तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. व्हाइट हाऊसजवळील लाफायेट स्क्वेअर उद्यानात एक जोडपे आपल्या लग्नांची 56वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. जेम्स मुलर आणि डोना मुलर असं या जोडप्याचं नाव होतं. (trending news video of lightning america three killed one injured in lightning near white house in maratha)


तिघांचा रुग्णालयात मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज पडल्याने चौघं जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती कोलंबिया अग्निशमन आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाच्या डिस्ट्रिक्टने दिली. या घटनेनंतर साधारण एक तासासाठी हे उद्यान बंद ठेवण्यात आलं होतं. 


व्हाइट हाऊसकडून शोक व्यक्त


या दुर्घटनेतील मृतांबद्दल व्हाइट हाउसकडून शोक व्यक्त करण्यात आला. व्हाइट हाउसचे प्रवक्त्याने म्हटलं आहे की, बिडेन प्रशासन मनापासून शोक व्यक्त करतो. तर प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी जखमींसाठी प्रार्थना करत असल्याचं सांगितलं. दरम्यान  USA व्हाइट हाऊस बाहेर पडलेली वीज आणि पावसाचा रौद्र अवतार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.