Viral Video: गाडी स्पीड ही कायम मर्यादीत असावी अन्यथा आपण अपघाताचे शिकार ठरतो. गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तरुण पिढी स्टाइल मारण्याच्या नादात रस्त्यावरुन जोरदार वेगाने बाइक चालवताना दिसतात. सुसाट वेगाने गाडी चालल्यामुळे तुमचा अपघात होऊ शकतो. कधी कधी तुमच्या या मुर्खपणाचे इतर लोकदेखील बळी पडतात. सोशल मीडियावर अनेक असे अपघाताचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भयानक आणि हादरुन टाकणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (trending video  bike rider road accident shocking video viral video on social media and person life was saved watch video)


सुसाट वेगाने जात असताना अचानक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये-जा सुरु आहे. अशात एक तरुण बाइकवरुन सुसाट वेगाने गाड्यांना कट मारत पुढे जात आहे. या तरुणाचा गाडीचा वेग पाहून कोणीही म्हणाल, मित्रा जरा सांभाळून... आणि काही क्षणात त्याने कधी विचारही केला नसेल अशी घटना त्याचा सोबत घडते. 


कार आणि ट्रकच्या मधून हा बाइकस्वार जाण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याची कारला धडक होते आणि तो ट्रकच्या चाकाखाली येतो. अरे देवा...



नशीब चांगल होतं त्या तरुणाचं या भीषण अपघातात त्या तरुणाची बाइक ट्रकच्या चाकाखाली येते. तो तरुण थोडक्यात वाचतो. ट्रकचालकाने लगेचच ब्रेक मारला म्हणून अनर्थ टळला. या हृदयद्रावक अपघातातून तरुणाचं नशीब आणि ट्रक चालकाचा शहाणपणामुळे हा तरुण थोडक्यात वाचला आहे. 


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Vicious Videos नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 31 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरुन गाडी चालवताना स्वत:सोबतच इतरांचा जीवाचा विचार करावा.