BMW1000rr bike ride 300 kmh speed : इंटरनेटवर बाईक राईडिंगचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेक बाईकस्वार आपलं बाईक चालवण्याचं स्किल व्हिडिओतून दाखवत असतात. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ आहेत. पण सध्या सोशल मीडियावर बाईकस्वाराचा एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण हेल्मेट (Helmet) न घालता ताशी 300 किलोमीटर वेगाने बाईक चालवताना दिसत आहे. इतक्या सुपर वेगाने बाईक चालवताना या तरुणाच्या चेहऱ्यावरची त्वचा अक्षरश: एखाद्या कपड्यासारखी फडफडताना दिसत आहे. जोराच्या वाऱ्यामुळे या तरुणाच्या चेहराच्या नक्शाच पूर्णपण बदलेला दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ malyshka_mma या नावाने इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यात एक तरुण BMW 1000 rr ही सुपर बाईक चालवताना दिसतोय. जवळपास 300 किमी वेगाने हा तरुण बाईक चावतोय, यामुळे वाऱ्याचा वेगही वाढला असून  तरुणाच्या चेहऱ्यावरची त्वचा हवेच्या वेगाने हलताना दिसत आहे. इतकंच काय तर वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की तो तोंडही बंद करु शकत नाहीए. या बाईकस्वाराच्या मागे एक तरुणी बसलेली या व्हिडिओत दिसत आहे. तिच्या चेहऱ्याची अवस्थाही तशीच झाल्याचं दिसंतय. 


युजर्सने व्यक्त केला संताप
ताशी 300 किमी वेगाने बाईक चालवणं हे जवळपास अश्यक्य आहे. त्यामुळे या तरुणाने केलेल्या धाडसावर अनेक युजर्सने संताप व्यक्त केला आहे. त्यातच या तरुणाने हेल्मेटही घातलं नव्हतं. यावरुनही युजर्सने त्याला फटकारलं आहे. केवळ एका रिलसाठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी या तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे, पण त्याचबरोबर मागे बसलेल्या तरुणीचाही जीव धोक्यात घातला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by #Motobaby (@malyshka_mma)


12 कोटी लोकांनी पाहिला व्हिडिओ
हा व्हिडिओ आतापर्यंत 12 कोटी लोकांनी पाहिला आहे. तर 32 लाक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय,  मी आतापर्यंत वाऱ्यावर केवळ केस आणि कपडे फडकताना पाहिले आहेत. पण पहिल्यांदाच चेहरा फडकताना पाहिलंय. तर एका युजरने विना हेल्मेट इतक्या वेगाने बाईक चालवणं गुन्हा असल्याचं म्हटलंय. एका युजरने तरुण-तरुणीला सदबुद्धी मिळो अशी प्रार्थना केली आहे.