Bride Viral Video : लग्न (marriage)...लग्नातील विधी, सोहळ्याची जागा, प्रत्येक गोष्ट कशी खास असायला हवं...त्यात नवरी (Bride) मुलीसाठी तर लग्नाचा दिवस खूप खास असतो. त्यामुळे ती त्यादिवशी सगळ्यात सुंदर नवरी दिसण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी करतं असते. ती तिच्या चेहऱ्याची, कपड्यांची अगदी दागिनी कुठले घालणार पाहून हेअरस्टाईल (hairstyle Video) कशी असणार यासाठी तयारी करतं असते. सगळं अगदी मनासारखं व्हावं असे आणि या खास क्षणाचे फोटो अप्रतिम यावे यासाठी ती खूप उत्सुक असते. तुम्हाला विश्वास बसणार नाही,  पण एका सुंदर नवरीने आपल्या लग्न मंडपात अचानक केस (Hair) कापले. हे कृत्य करण्यामागचं कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. 



हृदयस्पर्शी व्हिडिओ (Heart touching video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक मुलीला तिच्या केसांवर खूप प्रेम (love) असतं. लांब सडक केसांसाठी अनेक जण घरगुती उपायापासून अनेक गोष्टी करत असतात. पण एका सुंदर नवरीने आपल्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्येच (Wedding reception) केस कापले. हे वेड नाही तर काय आहे. पण यामागचं कारण ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण त्या नवरीच्या हिम्मतीचं जेवढं कौतुक करु तेवढं थोडं आहे. (Trending Video bride chops off her hair at wedding reception for Cancer patient viral on Social media) 


 


हेसुद्धा वाचा - VIDEO : रोमान्स करताना जगाचा पडला विसर, KISS करतानाचा 'तो' क्षण Viral



आणि म्हणून तीने केस कापले...


त्या नववधूने कर्करोगाच्या (Cancer) रुग्णांना दान करण्यासाठी केस (hair donation) कापले. नववधूच्या या धाडसी निर्णयाचं जग भरात कौतुक होतं आहे. तिचा हा निर्णय ऐकून नवरदेवपासून (Groom Video) वऱ्हाडीपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियावर (Social media Video) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा ती केस कापते आणि आपल्या निर्णय सांगते तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणवतात. 




व्हिडिओ व्हायरल 


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील (Instagram vidoe) @theunfilteredcollective अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1.5 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत तर कमेंट बॉक्समध्ये त्या तरुणीच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे.  हा व्हिडिओ अनेक जणांसाठी प्रेरणादायी आहे. गेल्या काही वर्षांपासून कर्करोगग्रस्तांना केस दान करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेतं आहे.