Viral Video Girl Lipstick Mark : आयुष्य एकदाच मिळतं, मग अशावेळी या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याला जगता आला पाहिजे. अगदी मनापासून प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद लुटता आला पाहिजे. असा आनंद लुटणे हा कमी जणांना जमतं. जे असं बिनधास्त निखळ आनंद लुटू शकतात, त्यांचा खरं हेवा वाटतो. सोशल मीडियावर एक तरुणी असाच आनंद लुटताना दिसतं आहे. पण तिचा हा आनंद इतरांसाठी काय संकट घेऊन आलं असेल त्याची आपण कल्पनाही करु शकणार नाही. (trending video girl secretly puts lipstick marks on men shirts at pub video get viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पबमध्ये गेलेली ही तरुणी डान्स करता करता जे वेडेपणाचे कृत्य करते ते पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. 


मजेदार व्हिडीओ 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुणी पबमध्ये डान्स करत करत तिथे असलेल्या परपुरुषांना गुपचूप त्यांच्या टीशर्टवर मागच्या बाजूने लिपस्टिकचे मार्क देते आहे. हे मार्क म्हणजे पाहणाऱ्याला वाटणार त्याचा प्रेयसीने तिला किस केली आहे. ती पबमधील अनेक तरुणांसोबत हे करते आणि एकट्यातच हसते. 


तरुणी हे सगळं मजा म्हणून करतेय पण तुम्ही विचार केला का? हे तरुण जेव्हा घरी जातील तेव्हा त्यांचा बायका किंवा प्रेयसी त्यांचं काय करेल ते...अनेकांच्या वैवाहिक जीवनात या लिपस्टिक मार्कमुळे वादळ येऊ शकतं. तरुणीच्या या कृत्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. 


हेसुद्धा वाचा - VIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या chutiyapa_begins_from_here या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इतर साइडवर व्हायरल झाला आहे.



या व्हिडीओवर कंमेंटस बॉक्समध्ये स्माइल इमोजीचा पाऊस पडतोय. एका यूजर्सने लिहिलं आहे की, त्या तरुणीचं कृत्य अनेकांच्या घटस्फोटाचं कारण होऊ शकतं. तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, "हे काम एखाद्या पुरुषाने केलं असतं तर?"